Raksha Bandhan 2019 special Stylish celeb inspired saree look to try on fastival
Raksha Bandhan 2019 : नक्की ट्राय करा सेलिब्रिटींचे स्टायलिश आणि ट्रेन्डी साडी लूक! By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 03:26 PM2019-08-14T15:26:08+5:302019-08-14T15:52:55+5:30Join usJoin usNext रक्षाबंधनाच्या दिवशी खास लूक करण्यासाठी प्रत्येक बहिण फार आधीपासूनच तयारी करत असते. या दिवसासाठी अनेक तरूणी आणि महिला एथनिक आउटफिट्सची निवड करतात. अशातच साडी नेसण्यासाठी तुम्ही जर मुहूर्त शोधत असाल तर रक्षाबंधनाचा मुहूर्त उत्तम आहे. हल्ली ट्रेडिशनल साडीऐवजी वेगवेगळ्या पद्धतींनी साडी नेसण्याचा ट्रेन्ड जोमात आहे. अशातच आपल्या बॉलिवूड सेलिब्रिटीही हटके स्टाइल साडी नेहमीच ट्राय करत असतात. तुम्हीही रक्षाबंधनाच्या दिवशी खास लूक करण्यासाठी या सेलिब्रिटींकडून टिप्स घेऊ शकता. तापसीची फ्यूजन साडी मिशन मंगलच्या प्रमोशनदरम्यान तापसी पन्नू फ्यूजन साडी कॅरी करताना दिसून आली. तिचा हा स्पगेटी स्टाइल साडी लूक फारच हटके होता. सर्वांपेक्षा वेगळा आहे हा लूक मिशन मंगलच्या प्रमोशनदरम्यान तापसी डिफरंट साडी लूक कॅरी करताना दिसून आली. तिचा हा लूक फारच डिफ्रंट होता. दिसाल सर्वांपेक्षा वेगळ्या रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला काही हटके ट्राय करायचं असेल तर तापसीचा हा फ्यूजन साडी लूक ट्राय करा. कृति सेनन सणाच्या दिवशी सुंदर दिसण्यासाठी तुम्ही सिम्पल फ्लोरल साडीही ट्राय करू शकता. कृति सेनन या साडीमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. ग्लॅमरस दिसेल साडी एखादी सिम्पल साडीही तुम्ही लो-वेस्ट नेसाल तर ग्लॅमरस दिसाल. शिल्पाची हटके स्टाइल शिल्पा शेट्टी नेहमीच साड्यांमध्ये एक्सपरिमेंट करताना दिसून येते. शिल्पाची ही स्टाइल कॉपी करू शकता. फुल स्लीव्स खास दिवशी आकर्षक लूक मिळवण्यासाठी फुल स्लीव्स ब्लाउज आणि प्लेन साडी भारी कॉम्बिनेशन ठरेल. दीपिका पादुकोन भावा-बहिणीच्या या पवित्र सणाच्या दिवशी व्हाइट साडीत फार सुंदर दिसाल. दीपिका पादूकोनकडून टिप्स घेऊ शकता. आलिया भट्ट साडीमध्ये प्रत्येक तरूणी आणि महिला फार सुंदर दिसतात. आलिया भट्टप्रमाणे तुम्ही साडी ट्राय करू शकता. माधुरी दीक्षित बॉलिवूडची धकधक गर्ल आणि साडी... भारीच. माधुरी म्हणेज अनेक तरूणांसोबतच तरूणींच्याही गळ्यातील ताईत. आपल्या हटके आणि क्लासी लूक्सनी ती नेहमीच फॅशन गोल्स देत असते. त्यातल्यात्यात माधुरीचा साडी लूक म्हणजे, क्या बात... टॅग्स :रक्षाबंधनफॅशनब्यूटी टिप्सबॉलिवूडसेलिब्रिटीदीपिका पादुकोणरेखातापसी पन्नूमाधुरी दिक्षितक्रिती सनॉनRaksha BandhanfashionBeauty TipsbollywoodCelebrityDeepika PadukoneRekhaTaapsee PannuMadhuri Dixitkriti Sonnen