- सारिका पूरकर- गुजराथीआपल्या सर्वांच्याच घरात इलेक्ट्रिसिटीचा स्वीच बोर्ड असतोच. पूर्वी हे स्वीचबोर्ड लाकडी चौकोनी तुकड्यांचे असायचे, परंतु आता हे स्वीच बोर्ड प्लॅस्टिकचे असतात. किती वर्षांपासून या स्वीच बोर्डला आपण आपल्या घरात पाहातो. पण स्वीचबोर्डला हात लागतो तो बटन दाबण्यासाठीच. एरव्ही घराचा लूक चेंज करताना लादीपासून पडद्यांपर्यंत सर्व बारीक सारीक गोष्टींचा विचार करून त्यावर नव्यानं हात फिरवला जातो. पण घरातले स्वीच बोर्ड मात्र आहे तसेच राहतात, त्यांच्याकडे पाहिलं की जुनं जुनं वाटतंच. खरंतर हे स्वीच बोर्डही सजवता येतात. त्यांनाही रंगीबिरंगी बनवता येतं. घरातले स्वीच बोर्डही आकर्षणाचं केंद्र बनू शकतात. त्यासाठी स्वीच बोर्डचा मेकओव्हर करावा लागतो. आणि ते तर एकदम सोपं आहे. स्वीच बोर्डचा मेकओव्हर कसा कराल?1) वाशी टेपबाजारात वाशी टेप मिळतो (विविध रंग आणि डिझाईन्स असतात यावर. जसा आपण टिक्सो टेप वापरतो तसाच असतो) त्याची आकर्षक रंगसंगतीतील रचना बोर्डवर साकारु शकता. उदाहरणार्थ दोन तीन रंगात, दोन तीन डिझाईनचा टेप घ्या. त्याची मांडणी एकाआड करुनही छान डिझाईन तयार होईल. टेप थेट स्वीच बोर्डावरच चिकटवायचा आहे.2) नकाशेघरात जुने नकोशे असतील तर ते कापून या स्वीचबोर्डवर बटनभोवती चिकटवून टाका. नकाशे हा घरसजावटीतील महत्वाचा घटक पूर्वीपासून मानला जातो.3) ग्लिटर्सबाजारात मिळणारे लिक्विड किंवा पावडर ग्लिटर्स स्वीच बोर्डवर लावले तर बोर्डला कलरफूल आणि ग्लिटरिंग लूक मिळेल. भिंतींच्या रंगसंगतीनुसार ग्लिटर्सचे रंग निवडा म्हणजे अधिक आकर्षक दिसेल. 4) जॉमेट्रिक पेंटिंगमास्किंग टेप किंवा पेंटर्स टेपचे तुकडे कापून घ्या. स्वीचबोर्डवर हे तुकडे चौकोनी, त्रिकोणी असे आकार एकत्र गुंफणाऱ्या रचनेत चिकटवा. टेपच्या आतील भागात आवडीचे अॅक्रेलिक रंग देऊन घ्या. रंग वाळले की टेप काढून टाका. टेप काढल्यावर टेप लावलेला भाग पांढरा दिसेल, या पांढऱ्या भागात आता गडद रंग द्या. म्हणजे डिझाईन आकर्षक दिसेल.5) डेकोरेटिव्ह पेपर्सघरात काही गुळगुळीत कागदांचे मासिके असतील तर त्याचे कागद कापून स्वीचबोर्डवर चिकटवा. अन्यथा बाजारात सुंदर हॅण्डमेड पेपर्स, क्राफ्ट पेपर्स, डेकोरेटिव्ह पेपर्स मिळतात ते चिकटवले तरी छान दिसेल. भिंतीसाठी वॉलपेपर्स वापरले जातात, त्याचे काही तुकडेही स्वीचबोर्डवर चिकटवून ते सुंदर बनवता येईल.6) खडे आणि पेबल्सबाजारात आकर्षक, चकाकणारे खडे मिळतात. ते खडेदेखील स्वीचबोर्डवर बटनोभोवती चिकटवून वेगळा लूक देता येतो. खड्यांप्रमाणेच विविध आकाराचे, रंगांचे पेबल्सही चिकटवून स्वीचबोर्डला सजवता येतं. 7) क्रोशा वर्कजर तुम्हाला क्रोशा विणकाम येत असेल तर स्वीचबोर्डच्या आकाराचं विणकाम करुन स्वीचबोर्डला लावू शकता. दिसायलही सुंदर आणि यातून स्वनिर्मितीचा आनंदही मिळतो. हे विणकाम करतानाही आकर्षक रंगसंगतीवर भर द्या. विणकाम करताना स्वीचबोर्डवरील बटनाच्या आकारातील भाग तेवढा मोकळा राहू द्या.8) शार्पी डिझाईनमार्कर पेनसारखे शार्पी पेन मिळतात, त्याच्या सहाय्यानं सुंदर डिझाईन तुम्ही थेट स्वीचबोर्डवर साकारु शकता.9) कापडघरात उपलब्ध असलेले, वापरात नसलेले परंतु आकर्षक रंग आणि डिझाइन्सचे कापड कापून स्वीचबोर्डवर मॉड पॉज ग्लूच्या सहाय्यानं चिकटवून टाका. स्वीचबोर्डचा नूर एकदम खुलून जाईल.10) टिश्यू पेपरस्पार्कलिंग टिश्यू पेपरचे तुकडे कापून ते स्वीचबोर्डवर मॉड पॉज ग्लूच्या सहाय्यानं चिकटवून टाका. स्वीचबोर्डला एकदम अॅबस्ट्रॅक्ट लूक मिळेल.