when bollywood actresses walked the ramp in bridal ensemble
नववधूच्या रूपात 'या' बॉलिवूड तारकांनी सर्वांना केलं घायाळ! By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 06:34 PM2018-10-29T18:34:12+5:302018-10-29T18:43:03+5:30Join usJoin usNext मुंबईमध्ये पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये अनेक बॉलिवूड तारकांनी रॅम्प वॉक केलं. आता तुम्ही म्हणाल की, यामध्ये नवीन असं काय? हा फॅशन शो इतर फॅशन शोपेक्षा वेगळा होता. कारण यादरम्यान सर्व बॉलिवूड अभिनेत्रींनी नववधूच्या वेशामध्ये रॅम्प वॉक केलं. काहींनी ट्रेडिशनल ब्राइडल आउटफिटमध्ये रॅम्प वॉक केलं तर काहींनी इंडो-वेस्टर्न ब्राइडल आउटफिटमध्ये रॅम्प वॉक केलं. तुम्हीही पाहा या नववधूच्या लूकमध्ये सजलेल्या बॉलिवूड तारकांच्या अदा... शोमध्ये फॅशन डिझायनर शान्तनु गोयनकासाठी शॉ स्टॉपर म्हणून अभिनेत्री करिश्मा कपूर राजस्थानी ब्राइडल लूकमध्ये रम्पवर उतरली होती. करिश्मा त्या लूकमध्ये एका प्रिसेंसप्रमाणे दिसत होती. सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री मलायका अरोराने या शोमध्ये सर्वांचं लक्ष आपल्याकडे वळवून घेतलं. मलायकाने डिझायनर कश्मीरासाठी रॅम्प वॉक केलं. ग्रे कलरचा लेहेंगा आणि ऑरेंज कलरची स्ट्रॅपलेस ब्रालेट ब्लाउजमध्ये ती फार सुंदर दिसत होती. सध्या वेब सिरिज आणि राधिका आपटे हे एक समिकरण तयार झालं आहे. राधिकाने नेव्ही ब्लू कलरचा लेहेंगा परिधान केला होता ज्यावर गोल्डन आणि सिल्वर कलरचं हेव्ही वर्क केलेलं होतं. राधिकाच्या या लूकची सर्वात खास गोष्ट म्हणजे नो एक्ससरीज. या ब्राइडल लूकमध्ये राधिकाने कोमतीही एक्ससरीज परिधान केली नव्हती. सोहानेही या शोमध्ये आपल्या लूकने सर्वांना घायाळ केलं. डिझायनर जिगर आणि निकिताने डिझाइन केलेल्या बेबी पिंक कलरच्या हेव्ही लेहेंग्यामध्ये सोहा एक रॉयल क्वीनप्रमाणे दिसत होती. जॅकलीन फर्नांडीस इंडो-वेस्टर्न ब्राइडल लूकमध्ये दिसून आली. डिझायनर शेहला खानने जॅकलीनसाठी पिंक कलरचा फ्रिलवाला लेहेंगा तयार केला होता. यामध्ये जॅकलीन एखाद्या परीप्रमाणे दिसत होती. वीरे दी वेडिंग स्टार स्वरा भास्करने डिझायनर रिचा मल्कानीसाठी रॅम्प वॉक केलं. स्वरा ब्ल्यू कलरच्या या लेहेंग्यामध्ये फार सुंदर दिसत होती. य लेहेंग्यावर गोल्डन कलरचं हेव्ही वर्क करण्यात आलं होतं. दंगल फेम अभिनेत्री फातिमा सना शेखने डिझायनर सोनाक्षी राजच्या कलेक्शनवर रॅम्प वॉक केलं होतं. फातिमाने लाइट कॉफी कलरचा फ्रिल असलेला लेहेंगा आणि एम्बेलिश्ड ब्लाउज परिधान केला होता. डेझी शहानेही या शोमध्ये रॅम्प वॉक केलं ती ब्लॅक लेहेंग्यामध्ये सुंदर दिसत होती. टॅग्स :बॉलिवूडकरिश्मा कपूरमलायका अरोराजॅकलिन फर्नांडिसराधिका आपटेस्वरा भास्करbollywoodKarisma KapoorMalaika Arora KhanJacqueline FernandezRadhika ApteSwara Bhaskar