पोलिसांना पाहून भल्याभल्यांना धडकी भरते. म्हणून तर ते पोलिसांपासून शक्य तितके लांब पळण्याचा/राहण्याचा प्रत्यत्न करतात. परंतु अँड्रीयाना कोलेस्झार या महिला पोलिस अधिकाऱ्याची गोष्टच निराळी आहे. तिने आम्हाला अटक करावे म्हणून लोक उतावळे झाले आहेत. जर्मनीतील या पोलिस अधिकाऱ्याच्या सौंदर्याची मोहिनी आता जगभर पसरली.३१ वर्षीय अँड्रीयाना तिच्या स्लिम-ट्रीम परफेक्ट बिकिनी बॉडीमुळे इंटरनेट सेन्शन बनली आहे. इन्स्टाग्रामवरील तिचे फोटो पाहून तर कित्येक ‘आशिक’ आम्हाला अटक कर म्हणून तिला गळ घालत आहे. इन्स्टाग्रामवर रोज फोटो शेअर करणाऱ्या अँड्रीयाचे एक लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तिला भेटता जर येत असेल तर आम्ही अटक व्हायलाही तयार आहोत असे तिच्या फोटोखाली लोक कमेंट करत असतात. तिच्या सौंदर्याचे गुणगाण करताना तर ते थकत नाहीत. अपघात, भांडण आणि घरगुती हिंसा विभागात काम करणारी अँड्रीयाना ड्युटीनंतर जिममध्ये कसून व्यायाम करते. तिचे ६३ किलो वजन आणि उंची ५ फूट ६ इंच आहे. ती सांगते, ‘माझ्या वेल टोनड् बॉडीचे रहस्य म्हणजे ३० टक्के शरीर व्यायाम आणि ७० टक्के पोषक आहार. प्रोटिन असणारे पदार्थ मी अधिक खाते. आठवड्यातून किमान पाच दिवस मी न चुकता व्यायाम करते.’बरं मग तिच्या अशा फोटोंमुळे पोलिस प्रशासनाकडून तिला काही त्रास होत असेल का? तर याचे उत्तर नाही असे द्यावे लागेल. कारण वरिष्ठांना तिच्या अशा फोटोंचे काही वावगे नाही. ती म्हणते, ‘सभ्यतेची मर्यादा सोडू नकोस एवढेच त्यांचे म्हणने आहे. माझ्या इंटरनेट प्रसिद्धीमुळे तेदेखील खुश आहेत. आणि मुळात मी हे फोटो महिलांमध्ये व्यायामाप्रती आवड निर्माण व्हावी म्हणून शेअर क रते. बाकी दुसरा कोणताच हेतू नाही.’ अँड्रीयानाने गेल्या वर्षी कोलोन बीच स्टाईल बिकिनी बॉडी-बिल्डिंग स्पर्धेतही सहभाग घेतला होता. तिचे एक यूट्यूब चॅनेलदेखील असून त्यावर ती वर्कआऊटचे व्हिडिओ पोस्ट करत असते. तिच्या तमाम चाहत्यांचे हृदय तोडणारी गोष्ट म्हणजे ती सध्या एका २८ वर्षीय जलतरणपटूला (स्विमर) डेट करत आहे.