'अग्गंबाई सुनबाई'च्या शुभ्रापेक्षा सुंदर दिसते अनुरागची रिअल लाइफ पत्नी; पाहा Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 02:58 PM2021-10-31T14:58:41+5:302021-10-31T15:04:42+5:30

Chinmay udgirkar: 'गोविंदा', 'देऊळबंद', 'प्रियतमा', 'धमक', 'पावडर', 'तो आणि मी' या चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिकांमध्ये झळकली आहे.

छोट्या पडद्यावर मध्यंतरी तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'अग्गंबाई सूनबाई'. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यातलाच एक कलाकार म्हणजे चिन्मय उदगीरकर.

या मालिकेत चिन्मयने अनुराग गोखले ही भूमिका साकारली होती. सुरुवातीला शुभ्राचा मित्र असलेला अनुराग शुभ्राच्या प्रेमात पडतो आणि या मालिकेला वेगळं वळण लागतं.

चिन्मयची या मालिकेतील भूमिका प्रचंड गाजली. सोबतच त्याच्या प्रोफेशनल लाइफबरोबर त्याच्या पर्सनल आयुष्याचीही चर्चा चाहत्यांमध्ये रंगली.

सध्या सोशल मीडियावर चिन्मयच्या पत्नीची चर्चा रंगली आहे. चिन्मयची पत्नी लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

चिन्मयच्या पत्नीचं नाव गिरीजा जोशी असून ती उत्तम अभिनेत्री आहे. अनेकदा सोशल मीडियावर तिच्या चित्रपटांची चर्चा होत असते.

चिन्मय -गिरीजाचं लव्ह मॅरेज असून कुटुंबाच्या संमतीने त्यांनी २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली.

गिरीजाने देखील मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे. स्वप्नील जोशी, अनिकेत विश्वास राव, गश्मीर महाजनी, सुबोध भावे यांच्यासोबत तिने स्क्रीन शेअर केली आहे.

'गोविंदा', 'देऊळबंद', 'प्रियतमा', 'धमक', 'पावडर', 'तो आणि मी' या चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिकांमध्ये झळकली आहे.

लग्नानंतर गिरीजाचा कलाविश्वातील वावर कमी झाला असून ती तिची स्वतःची डान्स अकॅडमी ती चालवते.

'नांदा सौख्य भरे', 'घाडगे अँड सून', 'सख्खे शेजारी' अशा गाजलेल्या मालिकांमध्ये चिन्मय झळकला आहे.

मेकअप, प्रेमवारी, वाजलच पाहिजे, श्यामचे वडील, गुलाबजाम या चित्रपटांमध्येही त्याने काम केलं आहे.