अरुंधती-मिहीर की संजना-अनिरुद्ध; कोण होणार 'महाराष्ट्राची सुगरण जोडी'?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 02:28 PM2024-07-09T14:28:01+5:302024-07-09T14:37:04+5:30

आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती-मिहिर, संजना-अनिरुद्ध यापैकी कोण स्पर्धा जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे (aai kuthe kay karte)

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'मध्ये सुरु होणार आहे 'महाराष्ट्राची सुगरण जोडी' स्पर्धा.

अरुंधती आणि मिहीरला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी अनिरुद्ध आणि संजनाने देखिल कंबर कसली आहे

समृद्धी निवास पुन्हा मिळवण्यासाठी अरुंधतीला पैश्यांची गरज आहे

स्पर्धा जिंकून पैसे कमावून समृद्धी बंगला वाचवता यावा म्हणूनच अरुंधती महाराष्ट्राची सुगरण स्पर्धेत भाग घेणार आहे

अरुंधतीची स्वयंपाकाची आवड सर्वांनाच माहित आहे

अरुंधतीला साथ देणारा मिहीर शर्मा उत्तम शेफ आहे

मात्र अरुंधती जिंकू नये यासाठी अनिरुद्ध आणि संजना देखिल या स्पर्धेत उतरले आहेत. त्यामुळे आता कोण जिंकणार हे पाहायचं आहे