बॉलिवूडपासून दूर तरी 'हा' अभिनेता करतो कोट्यवधींची कमाई; पत्नीसोबत जगतो लग्झरी आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 11:06 AM2023-06-26T11:06:04+5:302023-06-26T11:12:49+5:30

Aftab Shivdasani : अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत, मात्र आता तो चित्रपटात काम करत नाही. इंडस्ट्रीपासून दूर गेला आहे.

'हंगामा', 'ग्रँड मस्ती', 'ग्रेट ग्रँड मस्ती', 'क्या कूल हैं हम' यांसारख्या चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेता आफताब शिवदासानी हा आता 45 वर्षांचा आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत, मात्र आता तो चित्रपटात काम करत नाही. इंडस्ट्रीपासून दूर गेला आहे.

आफताबचा जन्म 25 जून 1978 रोजी मुंबईत झाला होता. बालकलाकार म्हणून त्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. वयाच्या नवव्या वर्षी आफताब पहिल्यांदा अनिल कपूरच्या 'मिस्टर इंडिया' या सुपरहिट चित्रपटात दिसला होता.

'मिस्टर इंडिया'नंतर त्याने 'शहेनशाह' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. आफताबने 'अव्वल नंबर', 'चालबाज' आणि 'इन्सानियत' सारख्या चित्रपटांमध्येही दमदार अभिनय केला.

1999 मध्ये, आफताब शिवदासानी याने वयाच्या 19 व्या वर्षी राम गोपाल वर्मा यांच्या 'मस्त' चित्रपटात मुख्य भूमिका साकारून पदार्पण केलं. या चित्रपटातून आफताब रातोरात स्टार झाला. या चित्रपटात त्याच्या अपोझिट उर्मिला मातोंडकर होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

चित्रपटातून आफताबला बेस्ट मेल डेब्यू आणि मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमर असे अनेक पुरस्कार मिळाले. आफताबने 'मस्ती', 'आवारा पागल दीवाना', 'हंगामा'सह अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली. मल्टीस्टारर कॉमेडी चित्रपटांमध्ये त्याने आपले खास स्थान निर्माण केले.

'कसूर', 'लव लिए कुछ भी करेगा', 'प्यार इश्क और मोहब्बत', 'कोई मेरे दिल से पूछे', 'क्या येही प्यार है', 'आवारा पागल दीवाना' आणि 'प्यासा' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, एवढी चांगली कथा असूनही आफताब प्रेक्षकांची मने जिंकण्यात अपयशी ठरला.

आफताबच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, आफताबने निन दुसांजशी लग्न केलं. आफताब आणि निन दुसांज यांचे 2014 साली लग्न झाले. आता त्याला एक मुलगा आहे. लग्नापूर्वी, निन मॉडेलिंगसह लक्झरी ब्रँड इंडस्ट्रीमध्ये कंसल्टेंट होती.

आफताब आज जरी चित्रपटात काम करत नसला तरी तो लक्झरी लाईफ जगतो आहे. मुंबईत त्याचे स्वतःचे आलिशान आणि सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज अपार्टमेंट आहे. यासोबतच त्याच्याकडे Audi RS 5 (1.09 कोटी) आणि BMW X6 (1.22 कोटी) देखील आहेत.

रिपोर्ट्सनुसार, आफताब आपलं प्रोडक्शन हाऊस आणि इतर इव्हेंट्सद्वारे वार्षिक 3 कोटी रुपये कमावतो. तो जवळपास 51 कोटींचा मालक आहे. आफताबचे काही चित्रपट आजही प्रेक्षकांना आवडतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.