शाहरुख खान, सुश्मिता सेनच्या मुलाच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, आज गाजवतेय ओटीटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 11:28 AM2024-08-05T11:28:07+5:302024-08-05T11:54:56+5:30

आज अभिनेत्री २५ वा वाढगिवस साजरा करत आहे.

शाहरुख खानच्या 'कभी अलविदा ना कहना' सिनेमात त्याच्या मुलाची भूमिका एका छोट्या अभिनेत्रीने साकारली होती. इतकंच नाही तर सुष्मिता सेनच्या 'वास्तूशास्त्र' या भयपटातही तिने मुलाची भूमिका केली. वाचून आश्चर्य वाटलं असेल ना?

ही अभिनेत्री आहे अहसास चन्ना (Ahsaas Channa). अहसासने बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली. अहसास चन्नाचे वडील पंजाबी फिल्म निर्माते आणि आई टीव्ही अभिनेत्री आहे.

अहसासच्या वडिलांनी करण जोहरवर आरोप लावले होते. तो त्यांना न सांगताच अहसासला कभी अलविदा ना कहनाच्या शूटसाठी न्यूयॉर्कला घेऊन गेला असा आरोप त्यांनी केला.इतकंच नाही तर त्यांनी पत्नीवरही आरोप केले. अहसासला लहानपणापासूनच तिच्या आईने पैशांची मशीन बनवलं असं ते म्हणाले होते.

अहसास लहानपणी प्रचंड ट्रोल झाली होती. दोन सिनेमांमध्ये लहान मुलाची भूमिका केल्याने तिचं सेक्स चेंज करण्यात आलं आहे का अशी चर्चा झाली होती. तिच्या मुलाच्या भूमिकांमुळे लोक तिला मुलगाच समजायला लागले होते. यानंतर मात्र तिने अशा भूमिका करणं बंद केलं.

अहसास चन्ना आज 24 वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या ओटीटी माध्यमात तिचाच बोलबाला आहे. 'कोटा फॅक्टरी','हॉस्टेल डेज','द इंटर्न्स','हाफ सीए' अशा एकानंतर एक तिच्या अनेक सीरिज आल्या.

अहसासने 'कसम से','सावधान इंडिया','मधुबाला', 'फियर फाईल्स', 'ओए जस्सी', 'क्राइम पेट्रोल' मध्येही काम केलं आहे.

अभिनयाशिवाय अहसास अभ्यासातही हुशार आहे. तिने सायकॉलॉजीमध्ये नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. सध्या ती वेगवेगळ्या सीरिजमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.