'बिग बॉस'चं घर दणाणून सोडणाऱ्या जान्हवी किल्लेकरचे पती अन् मुलासोबतचे फॅमिली फोटोज बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 03:14 PM2024-08-10T15:14:15+5:302024-08-10T15:19:05+5:30

सध्या बिग बॉस मराठीच्या घरात चर्चेत असणाऱ्या जान्हवी किल्लेकरचे पती आणि मुलासोबतचे खास फोटो बघा (jahnavi killekar, bigg boss marathi 5)

जान्हवी किल्लेकर ही बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सहभागी आहे. जान्हवीला आपण विविध मालिका आणि म्यूझिक व्हिडीओमध्ये अभिनय करताना पाहिलंय

जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठीच्या घरात तिच्या विशेष स्वभावामुळे चर्चेत आहे. तिचे घरात अनेक लोकांशी वाद झाले आहेत

जान्हवी किल्लेकरचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून तिला एक मुलगाही आहे. जान्हवीच्या नवऱ्याचं नाव आहे किरण किल्लेकर

किरण आणि जान्हवीला एक मुलगाही असून त्याचं नाव आहे इशान. इशान-किरणसोबत जान्हवीचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात

जान्हवी आणि किरणचं लव्ह मॅरेज आहे असं सांगण्यात येतं. डान्स क्लासमध्ये असताना दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं प्रेमात रुपांतर होऊन पुढे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असं समजतंय.

जान्हवीचा घरात आर्या जाधव, वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण अशा अनेक लोकांसोबत वाद झालेला दिसून आला

जान्हवी बिग बॉसच्या घरात १०० दिवस टिकणार की लवकर घराबाहेर जाणार, हे पुढील काही दिवसांमध्ये कळून येईलच