मूल नको म्हणून घेतला घटस्फोट, अभिनेत्याशी केलं दुसरं लग्न; 90s मधली ही अभिनेत्री आता कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 01:17 PM2024-07-31T13:17:21+5:302024-07-31T13:30:43+5:30

अभिनेत्रीने अनिल कपूरसोबत 'विरासत' मध्ये साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या एकाएकी पडद्यावरुन गायब झाल्या आहेत. ८०-९०चं दशक गाजवणाऱ्या काही अभिनेत्रींचं आज नावही ऐकू येत नाही.

त्यातलीच एक अभिनेत्री आहे जिला करिअरच्या सुरुवातीला खूप यश मिळालं.नंतर अचानक लग्न करुन ती स्क्रीनवरुन गायब झाली. अनेक वर्षांनंतर जेव्हा ती परत आली तेव्हा मात्र प्रेक्षकांनी तिच्याकडे पाठ फिरवली.

ही अभिनेत्री आहे पूजा बत्रा (Pooja Batra). सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पूजाचे वडील आर्मीमध्ये होते तर आई मॉडेल होती. आईकडूनच प्रेरणा घेऊन ती मॉडेलिंग क्षेत्रात आली.

1993 च्या 'फेमिना मिस इंडिया' मध्ये तिने सहभाग घेतला होता. नंतर ती काही जाहिरातींमधून समोर आली. त्यात तिला खूप पसंत केलं गेलं आणि तिला काम मिळत गेलं.

पूजाने 1997 साली अनिल कपूर आणि तबू यांची मुख्य भूमिका असलेल्या 'विरासत' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमातून तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. यानंतर ती 'हसीना मान जाएगी','चंद्रलेखा','कही प्यार ना हो जाए' या सारख्या सिनेमांमध्ये दिसली.

एकामागोमाग सिनेमांमध्ये काम करत असतानाच पूजाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. ३० सिनेमे केल्यानंतर तिने डॉक्टर सोनी अहलूवालियासोबत सातफेरे घेतले. लग्नानंतर ती अमेरिकेत शिफ्ट झाली. काही वर्ष त्यांचा सुखाचा संसार चालला. मात्र नंतर आपापसातील मतभेदांमुळे 2011 साली त्यांनी युएस कोर्टात अर्ज करत घटस्फोट घेतला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर पूजाला पुन्हा सिनेमांमध्ये काम करायचं होतं. तर सोनू तिच्या या निर्णयाविरोधात होता. त्याला मूल हवं होतं तर पूजा मात्र यासाठी तयार नव्हती.

घटस्फोटानंतर २०११ साली पूजा पुन्हा भारतात आली. तिने सिनेसृष्टीत कमबॅक केलं. हम तुम शबाना','एबीसीडी 2','किलर पंजाबी','मिरर गेम','स्क्वॉड' या सिनेमांमध्ये ती दिसली. मात्र तिची जादू यावेळी चालली नाही.

2019 साली पूजाने अभिनेता नवाब शाहसोबत दुसरं लग्न केलं. नवाब शाहने हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच तो 'भाग मिल्खा भाग','डॉन 2','दिलवाले' मध्येही दिसला.

पूजा आता ४८ वर्षांची आहे. तरी तिचा फीटनेस आणि सौंदर्य कमालीचं आहे. तिने बिकीनीमध्येही फोटो शेअर केलेत ज्यात ती खूपच बोल्ड दिसत आहे. पूजा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.