'मी स्वत:चं करिअर बर्बाद केलं', १३ वर्षांपासून गायब आहे हिरोईन; प्लास्टिक सर्जरीमुळे होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 01:10 PM2024-08-02T13:10:55+5:302024-08-02T13:51:27+5:30

सलमान, अक्षय, अजय देवगणसोबत केलं काम, बॉलिवूड अभिनेत्री कुठे गायब झाली?

अजय देवगण, अक्षय कुमार, सलमान खान आणि इतर अनेक अभिनेत्यांसोबत काम करणारी अभिनेत्र एकाएकी पडद्यावरुन गायब झाली. १३ वर्षा झाले ती इंडस्ट्रीपासून दूर आहे. तरी अभिनेत्री बऱ्याच काळापासून श्रीमंतीत टॉपच्या अभिनेत्रींना टक्कर देत आहे.

ही अभिनेत्री आहे रिमी सेन. २००३ साली आलेल्या 'हंगामा' मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये ती अक्षय खन्नासोबत झळकली. पहिल्याच सिनेमातून तिला ओळख मिळाली.

हंगामानंतर रिमीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. 'गोलमाल' मध्ये अजय देवगण तर 'क्योंकी' मध्ये ती सलमान खानसोबत दिसली. 'हेरा फेरी' ,'धूम' मध्येही ती झळकली. मात्र नंतर तिला म्हणावं तसं यश मिळालं नाही.

यानंतर काही वर्षात रिमीने इंडस्ट्री सोडली. चांगल्या भूमिका मिळत नसल्याने ती दूर गेली असं तिने कारण दिलं. रिमीने कॉमेडी सिनेमेच जास्त केले. सतत एकसारखेच चित्रपट करुन ती थकली होती. आवडीचं काम मिळत नसल्याने तिने इंडस्ट्रीला रामराम केला.

एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, "मी स्वत:च करियर खराब करुन घेतलं. माझ्या चुकांना मीच जबाबदार आहे. मी सलमानकडेही मदत मागणार नाही. चूक मी केली आहे तर मी त्याची मदत घेू शकत नाही."

2011 मध्ये ती शेवटची सिनेमात दिसली. करियरमध्ये दुसऱ्या संधीच्या शोधात असताना ती 'बिग बॉस'मध्ये सहभागी झाली. मात्र याचाही तिला काही फायदा झाला नाही.

इतक्या वर्षानंतर आता रिमीचा लूक पूर्णपणे बदलला आहे. ती आणखी ग्लॅमरस दिसत असून तिने प्लास्टिक सर्जरी केल्याचीही चर्चा आहे.'किती विचित्र दिसते','हिला ओळखणंही कठीण आहे' अशा कमेंट्स तिच्या लेटेस्ट लूकवर आल्या आहेत.