आईवडिलांचा घटस्फोट, सुपरस्टारची लेक एवढीच ओळख; अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 02:49 PM2024-11-15T14:49:04+5:302024-11-15T15:50:56+5:30

अभिनेत्री म्हणाली, "हट्टी पालकांनी आमचं पालनपोषण केलं, त्यांच्या घटस्फोटानंतर..."

आई आणि वडील दोघंही लोकप्रिय कलाकार. मात्र त्यांच्या घटस्फोटामुळे मुलींना झाला त्रास. सुपरस्टारच्या लेकीने व्यक्तकेल्या भावना

बातमी आहे श्रुती हसनची (Shruti Haasan). श्रुती ही साऊथ सुपरस्टार कमल हसन आणि सारिका यांची मोठी मुलगी. २००२ मध्येच कमल हसन आणि सारिका यांचा घटस्फोट झाला होता.

आईवडिलांच्या घटस्फोटाचा श्रुतीवर मोठा परिणाम झाला होता. वडील साऊथमध्ये प्रसिद्ध असल्याने ती मुंबईत आली. कारण तिला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची होती.

एका मुलाखतीत श्रुती म्हणाली, "लोक मला कमल हसनची मुलगी म्हणूनच ओळखतात. शाळेत असताना कोणी असं म्हटलं की मी म्हणायचे की, 'नाही, मी डॉ रामचंद्रन यांची मुलगी आहे'. डॉ रामचंद्रन आमच्या डेंटिस्टचं नाव आहे. मी पूजा रामचंद्रन आहे असं मी सांगायचे.

"मला लहानपणापासूनच माहित होतं की माझे वडील सर्वांपेक्षा वेगळे आहेत. आमचं पालनपोषण दोन हट्टी लोकांनी केलं ज्याचा परिणाम माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर झाला. ते दोघं वेगळे झाले आणि मी मुंबईला आले."

"सगळे लोक त्यांच्याबद्दलच विचारपूस करतात. मला वाटायचं की सगळं फक्त त्यांच्याच अवतीभोवती आहे. पण मी श्रुती आहे आणि मला माझी ओळख हवी होती. पण सगळीकडे जेव्हा बाबांचे पोस्टर लागले असतील तेव्हा स्वत:ला तिथून वेगळं करणं कठीण आहे."

"पण आता परिस्थिती बदलली आहे. मी आता कमल हसन यांच्याशिवाय श्रुती अशी कल्पनाही करु शकत नाही. त्यांच्याशिवाय माझं काहीच अस्तित्व नाही."