अदिती राव हैदरीचा पहिला पती आता आहे क्रिकेटरचा जावई, तर सिद्धार्थचंही हे दुसरं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 03:34 PM2024-09-18T15:34:00+5:302024-09-18T16:12:38+5:30

अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थच्या पहिल्या पार्टनरविषयी माहितीये का?

साऊथची सुपरहिट जोडी अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) आणि सिद्धार्थ (Siddharth) १६ सप्टेंबर रोजी लग्नबंधनात अडकले. ४०० वर्ष जुन्या मंदिरात त्यांनी सातफेरे घेतले. यावेळी जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते.

सिद्धार्थ अदितीच्या वेडिंग फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं. पारंपरिक लूकमध्ये त्यांनी सर्वांनाच प्रेमात पाडलं. त्यांच्या फोटोंवर सर्वांनीच शुभेच्छांचा वर्षाव केला.

अदिती आणि सिद्धार्थ काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. विशेष म्हणजे हे दोघांचंही दुसरं लग्न आहे. त्यांच्या पहिल्या पार्टनरविषयी माहितीये का?

अदिती वयाच्या २१ व्या वर्षीच सत्यदीप मिश्रासोबत (Satyadeep Mishra) लग्नबंधनात अडकली होती. २००९ मध्ये त्यांचं लग्न झालं तर २०१३ मध्ये घटस्फोट झाला. तेव्हा सत्यदीप अभिनय क्षेत्रात अॅक्टिव्ह होता. वकिली सोडून तो या क्षेत्रात होता. तर अदिती या क्षेत्रात नवीन होती.

सत्यदीप मिश्राने गेल्यावर्षीच नीना गुप्ता आणि वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांची लेक प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताशी (Masaba) लग्नगाठ बांधली. दोघंही लवकरच आईबाबाही होणार आहेत.

दुसरीकडे सिद्धार्थने २००३ साली मेघना नारायणसोबत (Meghana Narayan) लग्न केलं होतं. मेघना सिद्धार्थच्या शेजारीच राहायची. मात्र ४ वर्षानंतर २००७ साली त्यांचा घटस्फोट झाला. रंग दे बसंती नंतर सिद्धार्थ आणि सोहा अली खानच्या अफेअरच्या चर्चा होत्या. म्हणूनच सिद्धार्थचा घटस्फोट झाला अशी चर्चा झाली.

पहिल्या लग्नात अपयश आल्यानंतर काही वर्षांनी सिद्धार्थ आणि अदिती एकमेकांच्या प्रेमात पडले. तेलुगु सिनेमा 'महा समुद्रम'मध्ये त्यांनी एकत्र काम केलं. इथेच त्यांची ओळख झाली आणि ते प्रेमप्रकरण सुरु झालं.