कमाईमध्ये ऐश्वर्या देते बिग बींना टक्कर; जाणून घ्या महिन्याला किती कोटी कमावते

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 12:30 PM2021-11-01T12:30:00+5:302021-11-01T12:30:00+5:30

Aishwarya rai bachchan: ऐश्वर्याला गाड्यांची विशेष आवड असून तिच्याकडे मर्सिडीज बेंन्झ, ऑडी आणि मिनी कूपर या गाड्या आहेत.

बॉलिवूडचं ऐश्वर्य अर्थात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. १९९१ साली ऐश्वर्याने मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर हळूहळू तिचा मोर्चा बॉलिवूडकडे वळला.

ऐश्वर्याने कलाविश्वात येण्यापूर्वी अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय मॉडलिंग चॅम्पियनशीपवर स्वत: नाव कोरलं आहे.

ऐश्वर्याने मॉडलिंग क्षेत्रात नाव कमावल्यानंतर १९९७ मध्ये तिने तामिळ चित्रपट Iruvar या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन मणि रत्नम यांनी केलं होतं.

या चित्रपटाच्या यशानंतर ऐश्वर्याने १९९८ मध्ये और प्या हो गया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे तिने अनेकांची मनं जिंकली.

आज ऐश्वर्या बॉलिवूडमधील टॉप अॅक्ट्रेसपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे तिच्या लोकप्रियतेप्रमाणेच तिची कमाईदेखील आहे. म्हणूनच, ऐश्वर्याची एकूण कमाई किती ते पाहुयात.

caknowledgeच्या माहितीनुसार, ऐश्वर्या सध्या पती अभिषेक बच्चन आणि आराध्यासोबत मुंबईतील एका लक्झरी घरात राहते. त्याच्या व्यतिरिक्त तिचे मुंबईत एक आणि दुबईत एक अशी दोन घरं आहेत.

ऐश्वर्याला गाड्यांची विशेष आवड असून तिच्याकडे मर्सिडीज बेंन्झ, ऑडी आणि मिनी कूपर या गाड्या आहेत.

ऐश्वर्या एका चित्रपटासाठी ६ कोटी रुपये घेते. तर ब्रॅण्ड एंडोर्समेंटसाठी ७ कोटी रुपये मानधन घेते. तिची पर्सनल इन्व्हेस्टमेंट १८२ कोटी रुपये आहे. गेल्या काही काळापासून ऐश्वर्याच्या कमाईच्या आकडेवारीत वाढ होत आहे. २०२० मध्ये तिची कमाई १३ कोटी रुपये होती.

caknowledge डॉट कॉमच्या माहितीनुसार, ऐश्वर्याचं नेट वर्थ २२७ कोटी रुपये आहे. यात तिची महिन्याची कमाई आणि अन्य इनकम मिळून १ कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ऐश्वर्या वर्षाला १२ कोटी रुपये कमावते.

२००४ मध्ये ऐश्वर्याने एक फाऊंडेशन सुरु केलं असून या अंतर्गत ती गरजू व्यक्तींना मदत करत असते.