ऑनलाइन लोकमत पॅरिस, दि. १६ - कान्स चित्रपट महोत्सवातील ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकची नेहमीच माध्यमांमध्ये चर्चा असते. रविवारी कान्समधला ऐश्वर्याचा लूक असाच माध्यमांमध्ये खासकरुन टि्वटरवर चर्चेचा विषय ठरला आहे. रविवारी ऐश्वर्या माध्यमांसमोर आली तेव्हा तिने ओठांना उठावदार जांभळया रंगाचे लिपस्टिक लावले होते. नेहमीपेक्षा तिचा हा लूक एकदम वेगळा होता. मेकअपमध्येही ऐश्वर्याचे सौदर्य खुलून दिसते पण यावेळी ऐश्वर्याची लिपस्टिकच जास्त उठून दिसत होती. यावर टि्वटरवरुन वेगवेगळया प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. काल तिच्या 'सरबजीत' या आगामी चित्रपटाचे कान्समध्ये स्क्रिनिंग झाले. कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या गोल्डन ड्रेसमध्ये अवतरतली आणि तिने अनेकांना घायाळ केले. यात तिचा पती अभिषेक बच्चनही होता. अभिषेकने तिचा ब्लँक अँड व्हाईट लूकमधला फोटोही सोशल मिडीयावर पोस्ट करुन एक फोटो हजार शब्दांचे काम करतो असा संदेश लिहीला होता. ऐश्वर्याच्या लूकबाबत ट्विटरवरील काही प्रतिक्रिया : - @ theblahqueen : Smokey eyes with purple lipstick just doesn't go together - @Chirpy_Kulfi : Who in the world chooses Aishwarya Rai's dresses for #Cannes? Terrible so far. Especially that horrific purple lipstick. - @Swetha_07 : Okay that purple lipstick worn by Aishwarya Rai looks extremely bad. - @SankiAnkita : Aishwarya Rai's lipstick is bomb though. petition for aishwarya rai to fire her make up artistwhat are those purple lips — nurgülsʰᵃʸᵃᵗ (@hasretfull) May 15, 2016