अजय-काजोलच्या गोव्यातील व्हिलामध्ये करु शकता मुक्काम, मोजावे लागतील 'इतके' रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 11:49 AM2024-10-13T11:49:04+5:302024-10-13T12:14:26+5:30

अजय-काजोलचा गोव्यातील व्हिला भाडेतत्वावर उपलब्ध झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगन हे सेलिब्रिटी कपल प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघांना बॉलिवूडमधील आदर्श जोडी मानले जाते. जगभरात या जोडीचे चाहते आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

काजोल आणि अजयबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्याचे चाहता आतुर असल्याचेही दिसून येते. पण आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, जी स्वप्नवत वाटू शकते.

अजय देवगण आणि काजोल यांचा गोव्यामध्ये एक आलिशान बंगला आहे. ज्याचे नाव एटर्ना असे आहे. या व्हिलाशी कालोज आणि अजयच्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत.

आता याच व्हिलामध्ये तुम्हाला राहण्याची संधी मिळाली आहे. तुम्ही या व्हिलामध्ये मुक्काम करु शकता.

कारण, अजय आणि कोजलने हा व्हिला भाडेतत्वावर उपलब्ध करुन दिला आहे. गोव्यातील मोइरामध्ये हा आलिशान व्हिला आहे.

यामध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी तुम्हाला फक्त 1.10 लाख रुपये मोजावे लागतील. पाच बेडरूम आणि खासगी स्विमिंग पूल या व्हिलामध्ये आहे. पोर्तुगीज शैलीत हा व्हिला बांधलेला आहे.

या व्हिलामध्ये अनेक आधुनिक सुविधा आहेत. विशेष म्हणजे या व्हिलामध्ये एक शंभर वर्षे जुनी विहीर देखील आहे. तसेच या व्हिलामध्ये एक लिफ्टदेखील आहे.

अलीकडेच, जान्हवी कपूरने चेन्नईतील श्रीदेवीच्या बंगल्याचे नूतनीकरण करून तो भाड्याने उपलब्ध करून दिला होता.

आता काजोल आणि अजयनेही जान्हवीच्या पाऊलावर पाऊल ठेवल्याचं दिसून येत आहे. GQ ने याबाबत वृत्त दिलं आहे. तसेच कर्ली टेस्लने याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.