Shloka Ambani : अंबानी कुटुंबीयांची सून श्लोकाचा ट्रेडिशनल लूक, तुम्ही पाहिलंय का कलेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 01:10 PM2022-06-09T13:10:46+5:302022-06-09T13:20:33+5:30

आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता हिचा चेहरा सर्वांच्याच परिचयाचा आहे. अलीकडेच ती राधिका मर्चंटच्या 'अरंगेत्रम' सोहळ्यात दिसली होती.

आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता हिचा चेहरा सर्वांच्याच परिचयाचा आहे. अलीकडेच ती राधिका मर्चंटच्या 'अरंगेत्रम' सोहळ्यात दिसली होती. यामध्ये तिच्या लूकची खुप चर्चाही झाली होती. श्लोका मेहताने शाही गुलाबी साडी आणि स्टेटमेंट ज्वेलरी परिधान केली होती. तर दुसरीकडे श्लोका मेहताने सिल्व्हर हिल्सही कॅरी केले होते.

साडीच्या काठावर पांढऱ्या नेटची लेसही होती. श्लोका मेहता पारंपारिक पोशाखात दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही श्लोका मेहता अनेकवेळा अतिशय सुंदर पोशाखात दिसली होती. तिचे पारंपारिक पोशाखांचे कलेक्शनही जबरदस्त आहे.

तुम्ही श्लोका मेहताचे थ्रोबॅक फोटो आणि कलेक्शन पाहिल्यास लग्नसमारंभात परिधान करण्यासाठी ट्रेडिशनल आऊटफिट कसं असावं याची नक्कीच कल्पना येईल. श्लोका मेहताने 'अरंगेत्रम' सोहळ्यात सिल्कची साडी नेसली होती.

श्लोका मेहताने या पारंपारिक ड्रेपसह हेवी मोत्याचे डिझाइन केलेले ब्लाउज परिधान केले होते. राजस्थानी कुंदन इयररिंग्ससोबत गोल्डन शीश पट्टी (मोटिफ हेअरबँड) लावली होती. मेकअपही अगदी साधा आणि एलिगेंट ठेवला होता.

श्लोका मेहतालाही लेहेंगा घालणे आवडते. मग ते लग्न असो वा कोणताही अन्य समारंभ. तिचा लूक कायमच चर्चेचा विषय ठरत असतो. तिला पारंपरिक लेहेंगा परिधान करायला आवडते. पिवळ्या रंगाचा अंबर लेहेंगा श्लोका मेहताने कॅरी केला होता आणि तो अनामिका कन्नाने डिझाइन केला होता.

२०१९ मध्ये श्लोकानं आकाश अंबानीसह लग्नगाठ बांधली. त्यावेळी तिनं सुंदर आऊटफिट कॅरी केला होता. तिनं मल्टिकलर ह्यूवाला एक लहेंगा सेट परिधान केला होता. तो अबूजानी संदीप खोसला यांनी डिझाईन केला होता.

तिला आपल्या स्टाईलमध्ये एक्सपरिमेंट करायला आवडचं. फ्युजन आऊटफिटही तिला खुप आवडतो. अर्जुन कोठारींच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये श्लोका मेहतानं लॅवेंडर ह्यू कॅप स्टाईल सेट परिधान केला होता.

यानंतर २०२० मध्ये तिनं अरमान जैनच्या विवाहसोहळ्यात मल्टीकलर पॅनल्ड लेहंगा परिधान केला होता. तो सव्यसाची यांनी डिझाईन केला होता. यासोबतच ग्रीन ब्लाऊज कॅरी केला होती. यासोबतच शियर दुपट्टा आणि हेवी पोल्का ज्वेलरीही कॅरी केली होती.

टॅग्स :फॅशनfashion