Akshaya-Hardik Reception Photos : राणादा-पाठकबाईंचा राजेशाही थाट!, पाहा अक्षया आणि हार्दिकच्या रिसेप्शनचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 11:54 AM2022-12-03T11:54:28+5:302022-12-03T12:01:21+5:30

Akshaya-Hardik Reception Photos : रिल लाईफमधली ही जोडी आता रिअल लाईफमध्येही पती-पत्नी झाले आहेत.

तुझ्यात जीव रंगला फेम राणादा आणि पाठकबाई म्हणजेच हार्दिक जोशी (Hardik Joshi) व अक्षया देवधर (Akshaya Deodhar) काल म्हणजेच २ डिसेंबरला लग्नबेडीत अडकले आहेत.

मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रमानंतर हार्दिक व अक्षयाच्या लग्न सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.

पुण्यात हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांचा लग्न सोहळा पारंपारिक पद्धतीने पार पडला.

या लग्नसोहळ्याला त्या दोघांच्या नातेवाईक परिवारासोबत मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारदेखील उपस्थित होते.

त्यांच्या लग्नाचे सध्या व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

अक्षया आणि हार्दिकने रिसेप्शनसाठी जांभळ्या रंगाच्या आउटफिटची निवड केली होती.

यावेळी अक्षयाने जांभळ्या रंगाचा लेहंगा आणि तिला मॅचिंग हार्दिकने जांभळ्या रंगाची शेरवानी घातली होती.

या गेटअपमध्ये अक्षया आणि हार्दिकचा राजेशाही थाट पाहायला मिळाला.

त्यांच्या रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रिल लाईफमधली ही जोडी आता रिअल लाईफमध्येही पती-पत्नी झाले आहेत.