Aly Goni : "आपण लग्न करू तेव्हा..."; अली गोनीने नताशा स्टँकोविचसोबतच्या ब्रेकअपवर सोडलं मौन By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 11:02 AM 2024-08-28T11:02:25+5:30 2024-08-28T11:25:02+5:30
Aly Goni And Natasa Stankovic : अली आणि नताशा कधीही त्यांच्या ब्रेकअपबद्दल बोलले नाहीत, परंतु अलीकडेच अभिनेत्याने त्यांच्या ब्रेकअपमागचं खरं कारण सांगितलं आहे. अली गोनी आणि नताशा स्टँकोविच हे दोघंही नच बलिएच्या नवव्या सीझनमध्ये एकत्र दिसले होते, पण शो संपल्यानंतर लगेचच त्यांचं ब्रेकअप झालं. मात्र, दोघे का वेगळे झाले हे कोणालाच माहीत नाही.
अली सध्या अभिनेत्री जस्मिन भसीनला डेट करत असून नताशाने क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत लग्न केलं होतं. मात्र आता ते दोघेही वेगळे झाले आहेत. अली आणि नताशा कधीही त्यांच्या ब्रेकअपबद्दल बोलले नाहीत, परंतु अलीकडेच अभिनेत्याने त्यांच्या ब्रेकअपमागचं खरं कारण सांगितलं आहे.
नताशा स्टँकोविच आणि अली गोनी रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी ही गोष्ट कोणापासून लपवून ठेवली नाही. मात्र, एके दिवशी त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली. त्यांचं नातं का तुटलं? हा प्रश्न कायम राहिला. आता अली गोनीने मौन सोडलं आहे.
अलीने भारती सिंगच्या पॉडकास्टवर ही हिंट दिली आहे. त्याच्यात आणि नताशामध्ये घडलेल्या गोष्टी त्याने हिंट देत सांगितल्या. भारतीसोबतच्या संभाषणात एक्स गर्लफ्रेंडचं नाव न घेता तो तिच्याबद्दल बोलला आहे.
अलीने सांगितलं की, जस्मिनच्या आधी ज्या मुलीशी त्याचे संबंध होते, तिला त्य़ाच्या कुटुंबासोबत राहायचं नव्हतं. अली म्हणाला, "माझं यापूर्वी रिलेशन होतं, ते खूप सीरियस होतं. तिचं कारण तिने मला सांगितलं आणि म्हणाली, यार, जेव्हा आपण भविष्यात लग्न करू, तेव्हा आपण वेगळे राहू. ही गोष्ट मला पटली नाही."
अली पुढे म्हणाला की, "मी तिच्या बोलण्याशी सहमत नाही. मी जिथे जाईन तिथे माझ्या कुटुंबाला सोबत घेऊन जाईन. मी माझं कुटुंब माझ्यापासून वेगळं करू शकत नाही. जगात कोणतीही ताकद आली तरी मी त्यांना सोडू शकत नाही."
अली त्याच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. तो बिग बॉसमध्ये असताना त्याचे कुटुंब दाखवण्यात आले होते. आई-वडिलांसोबतच त्याचे भाऊ-बहिणीवरही खूप प्रेम आहे. तो त्याच्या भाचीच्या खूप जवळ आहे.
अलीचा मोठा भाऊ अर्सलान गोनी हृतिक रोशनची एक्स वाईफ सुजॅन खानसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अली गोनी सध्या अभिनेत्री जस्मिन भसीनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
नताशा स्टँकोविच आणि हार्दिक पांड्याने वेगळे होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना विभक्त झाल्याची माहिती दिली होती. त्यांना अगस्त्य नावाचा एक मुलगा देखील आहे.
हार्दिक पांड्याआधी लोकप्रिय टीव्ही अभिनेता अली गोनी हा देखील नताशा स्टँकोविचच्या प्रेमात वेडा झाला होता. नताशा २०१४ पासून अली गोनीला डेट करत होती. पण काही कारणास्तव हे नातं फार काळ टिकलं नाही.
अली गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही अभिनेत्री जॅस्मिन भसीनला डेट करत आहे. चाहत्यांना या जोडीला एकत्र पाहायला आवडतं. अली आणि जॅस्मिन अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबत वेळ घालवतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात.