अंबानींच्या 'अँटिलिया' मधील सोहळ्याला हजेरी लावलेली 'ती' सौंदर्यवती नक्की आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 03:50 PM2024-07-08T15:50:09+5:302024-07-08T16:24:28+5:30

Beautiful Lady Spotted at Anant Ambani Radhika Merchant Marriage Function: ना भरगच्च दागिने, ना भरपूर मेकअप... तरीही सगळीकडे रंगली तिचीच चर्चा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातील मामेरु हा विधी नुकताच अँटिलियामध्ये पार पडला. यावेळी सर्व पाहुणे सजून-धजून आले होते.

या सर्व पाहुण्यांच्यात अतिशय साधा मेकअप आण मोजकेच दागिने घालून एका तरुणीने हजेरी लावली. पापाराझीनेही तिची छबी कॅमेरात कैद केली अन् सध्या ती तरुणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. कोण आहे 'ती'.. जाणून घेऊया.

या विधीदरम्यान ही तरुणी आपल्या पतीसोबत सोहळ्याला उपस्थित होती. तिने एक नेकलेस, डायमंड इअररिंग्स आणि ब्रेसलेट इतकी ज्वेलरी परिधान केली होती. ही तरुणी म्हणजे राधिकाची मोठी बहिण अंजली मर्चंट-मजिठिया. (Anjali Merchant Majithia)

अंजली आणि राधिका या एकमेकांच्या केवळ बहीणीच नसून खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. राधिकानंतर आता सोशल मीडियावर अंजली मर्चंटबद्दल चर्चा सुरू आहे.

अंजलीचे फोटो व्हायरल होत असून ती कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नसल्याचं चाहते म्हणत आहेत. राधिकाप्रमाणे तिची बहीणही खूप सुंदर आहे.

अंजली मर्चंट फिटनेस फ्रिक आहे. स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीतही ती अभिनेत्रींना टक्कर देते. अंबानी कुटुंबाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ती स्पॉट झाली आहे.

अंजली ही देखील स्वतः एक उद्योजिका आहे. अंजली मर्चंटचे २०२० साली अमन मजिठिया यांच्याशी लग्न झालं.

अंजली 'ड्रायफिक्स'ची सह-संस्थापक आहे आणि पिढीजात चालत आलेला व्यवसायही सांभाळते. व्यावसायिक कुटुंबातील असल्याने अंजली मर्चंटने आपल्या परिश्रमाने स्वतःची वेगळी ओळख व्यापार विश्वात निर्माण केली आहे.

प्री-वेडिंग सोहळा किंवा इतर कार्यक्रम असो, अंजली आणि राधिका या दोघींमधील बॉन्डिंग कायमच दिसून आले आहे. मर्चंट दाम्पत्याच्या या दोनीही मुली अत्यंत देखण्या आणि तितक्याच सालस आहेत.

अंजली मर्चंट आणि अमन मजिठिया या दाम्पत्याला एक गोड, गोंडस मुलगा देखील आहे. अंजलीचे सोशल मीडियावर त्याच्यासोबतही काही फोटो व्हायरल झाले आहेत.