हे बार्बी! गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अनन्या पांडेचा बोल्ड लुक, कॅमेरासमोर दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 06:11 PM2024-06-09T18:11:48+5:302024-06-09T18:18:37+5:30

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

नुकतेच अनन्याने तिचे गुलाबी रंगातील ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

गुलाबी रंगाच्या वनपीसमध्ये अनन्या पांडे अतिशय सुंदर दिसत आहे.

अनन्या पांडेचं हे रूप पाहून तिचे चाहते तिला बार्बी म्हणत आहेत.

गुलाबी रंगाच्या आऊटफीटवर अनन्याने मॅचिंग कानातले घातले आहेत.

अनन्याचा आजचा हटके अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पडलेला आहे.

अभिनेत्री तिच्या कातील अदांनी चाहत्यांना तर अक्षरश: वेडच लावले आहे.

अनन्याने तिचे केस मोकळे सोडले होते. त्यानं तिच्या लुकमध्ये अजूनच भर टाकली.

काही हॉट पोझ देत अनन्याने फोटो पोस्ट केले आहेत. यामधील तिचा मेकअप लूक चाहत्यांना भुरळ घालणारा आहे.

अनन्या पांडे हिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिची 'Call Me Bae' ही सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे.