Ankita Lokhande latest photoshoot in saree Check Out Her gorgeous Picks
PHOTO: तुम हुस्न परी...अंकिता लोखंडेची जबरदस्त स्टाइल; फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ! By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 03:56 PM2024-04-29T15:56:33+5:302024-04-29T16:08:27+5:30Join usJoin usNext 'पवित्रा रिश्ता' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. या मालिकेने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टा वर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दिसून येणाऱ्या अंकिताच्या साडीने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. अंकिताने तिचे जे फोटो इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत, त्याला तिने Isn’t this a perfect summer saree?.... असं कॅप्शन दिलं आहे. अंकिताने परिधान केलेल्या साडीवर मॅचिंग अतिशय ट्रेंडी झुमके घातले आहेत, जो तिच्या लुकमध्ये आकर्षण वाढवत आहे अंकिताने या साडीवर मॅचिग ब्लाऊज घातले आहे. या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. अंकिता या साडीत अतिशय सुंदर दिसत असून तिचं हे रूप तिच्या चाहत्यांना भलतंच आवडलं आहे. नाजूक पाना- फुलांची डिझाईन असलेली ही साडी खूपच मोहक आहे. ओपन हेयर्स, स्मोकी मेकअप, डार्क लिपस्टिक असा संपूर्ण लूक अंकिताने केलेला आहे. यासोबतच अंकिताने एका पेक्षा एक स्टायलिश लूकमध्ये फोटो पोजेस दिल्या आहेत. आता अंकिता संजय सिंह यांच्या 'आम्रपाली' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.टॅग्स :अंकिता लोखंडेसेलिब्रिटीबॉलिवूडAnkita lokhandeCelebritybollywood