PHOTO : अंकिता लोखंडेचा मोस्ट स्टायलिश लूक, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 05:26 PM2024-06-07T17:26:04+5:302024-06-07T17:35:52+5:30

अंकिता लोंखडे ही खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे.

अंकिता सोशल मीडियावर एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. चाहते तिच्या फोटोंची आतूरतेने वाट पाहत असतात.

अंकिता हिनं नुकतेच सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

अंकिता पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचे फोटो काही वेळातच व्हायरल झाले आहेत.

अंकितानं बोल्ड पोझ देत तिनं चाहत्यांना घायाळ केलंय. या फोटोंमध्ये अंकिताच्या हेअर स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अंकिताच्या अदा पाहून चाहतेही फिदा झाले आहेत. या फोटोंवर ते खूप लाईक आणि कमेंट करत आहेत.

अंकिताच्या हाताला दुखापत झाली होती. फोटोंमध्ये तिच्या हातावरील प्लास्टर दिसून आलं.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अंकिता ही अभिनेता रणदीप हुड्डासोबत 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटात झळकली. या सिनेमात तिनं वीर सावकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली होती.

यासोबतच अंकिता लोखंडेच्या हातात सध्या अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे.

आता अंकिता संजय सिंह यांच्या 'आम्रपाली' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.