मराठी सिनेइंडस्ट्रीत आणखी एक स्टारकिड एन्ट्री करण्यासाठी सज्ज, दिसते खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 04:01 PM2023-09-21T16:01:54+5:302023-09-21T16:06:54+5:30

बॉलिवूडप्रमाणे मराठी सिनेइंडस्ट्रीतही स्टारकिड्स कार्यरत आहेत. आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील आणखी एका स्टार किडची मराठी सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री होत आहे.

बॉलिवूडप्रमाणे मराठी सिनेइंडस्ट्रीतही स्टारकिड्स कार्यरत आहेत. आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील आणखी एका स्टार किडची मराठी सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री होत आहे. अभिनेता, दिग्दर्शक लोकेश गुप्ते आणि त्याची पत्नी आणि भार्गवी चिरमुलेची बहीण चैत्राली गुप्ते यांची लेक शुभवी गुप्ते आता लवकरच अभिनय क्षेत्रातून पदार्पण करत आहे.

शुभवी आणि तिचे बाबा लोकेश गुप्तेचे अनेक मजेशीर व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्रामवर पाहायला मिळतील. शुभवीचे कोडे आणि त्यावरील तिच्या बाबांचे उत्तर या मजेशीर गमतीजमती पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतात.

शुभवी उत्तम डान्सर तर आहेच पण तिला अभिनयाची देखील आवड आहे. शुभवीने नुकतीच एका नामवंत ब्रँडची जाहिरात केली. तिच्या या कामाचे सर्वांनी मोठे कौतुकही केले.

एक सांगायचंय या चित्रपटात शुभवी एका बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती मात्र आता तिला प्रमुख भूमिकेसाठी मराठी सृष्टीत दाखल होण्याची इच्छा आहे.

याबाबत शुभवी सांगते की मला अभिनय क्षेत्रात यायचंच आहे कारण आईवडील दोघांनाही मी लहानपणापासून या क्षेत्रात पाहत आलेली आहे त्यामुळे या क्षेत्राची एक ओढ निर्माण झाली आहे.

यावर लोकेश गुप्तेचं म्हणणं आहे की, शुभवी ही खूप गुणी मुलगी आहे. तिला कोणत्या क्षेत्रात काम करायचंय याची आम्ही कधीच तिच्यावर बंधनं लादली नाहीत. तिला ज्या क्षेत्रात जाण्याची इच्छा असेल तिथे तिने काम करावं.

तर चैत्राली गुप्ते या देखील हिंदी मालिका करून घरसंसार सांभाळत आहेत. शुभवी आणि लोकेशच्या सपोर्ट मुळेच मी हे करू शकले. ती खूप समजूतदार मुलगी आहे. तिच्या कामचंही लोकांकडून वेळोवेळी कौतुक होत असतं, असं त्या म्हणतात.

दरम्यान शुभवी आता कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची अधिक उत्सुकता आहे.