मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने काढला टॅटू, म्हणतो- "माझी आई म्हणायची की..." By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 01:11 PM 2024-11-21T13:11:04+5:30 2024-11-21T13:23:38+5:30
काही दिवसांपूर्वीच अर्जुन आणि मलायका अरोराचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता अर्जुन कपूरने टॅटू काढला आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे आणि सिंघम अगेन सिनेमामुळे चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वीच अर्जुन आणि मलायका अरोराचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता अर्जुन कपूरने टॅटू काढला आहे.
अर्जुनने त्याच्या पाठीवर टॅटू काढला आहे. याबाबत त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्याने पाठीवर 'रब राखा' असं गोंदवून घेतलं आहे. याचा अर्थही त्याने पोस्टमध्ये सांगितला आहे.
"रब राखा - देव नेहमी तुझ्यासोबत राहील. माझी आई सुख आणि दु:खात नेहमी हे म्हणायची. आजही मला वाटतं की ती माझ्याबरोबर आहे. माझ्यावर लक्ष ठेवतेय आणि मला योग्य दिशा दाखवतेय".
"सिंघम अगेन सिनेमाच्या प्रदर्शनाच्या दिवशी संध्याकाळी मी हा टॅटू काढला. आणि आता नवी सुरुवात करत असताना मला असं वाटतं की ती माझ्यासोबत आहे. मला आठवण करून देतेय देवाचे वेगळे प्लॅन आहेत".
"थँक्यू माँ, रब राखा", असं कॅप्शन अर्जुन कपूरने या पोस्टला दिलं आहे.
अर्जुन कपूरच्या या टॅटूने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.