प्रशस्त खोल्या, स्विमिंग पूल अन् दारापुढे हिरवळ! अवधूत गुप्तेचा फार्महाऊस पाहिलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 12:08 PM2023-09-05T12:08:03+5:302023-09-05T12:14:33+5:30

Avdhoot gupte: अवधूतने प्रचंड मोठं, प्रशस्त असं फार्महाऊस बांधलं असून यात स्विमिंग पूल वगैरेदेखील आहे.

मराठी कलाविश्वातील रॉकिंग गायक, दिग्दर्शक, संगीतकार म्हणजे अवधूत गुप्ते. आजवर अवधुतने मराठी कलाविश्वाला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.

सध्या अवधूत त्याच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमामुळे चर्चेत येत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात राजकीय व्यक्तींपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

मुंबई,पुणे अशा धकाधकीच्या शहरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला एखाद्या खेड्यात, डोंगराच्या पायथ्याशी आपलं घर असावं असं वाटतं. याला अवधूतदेखील अपवाद नाही.

मुंबईत राहणाऱ्या अवधूतचा एक सुंदर फार्म हाऊस आहे. बऱ्याचदा रोजच्या रुटीनचा कंटाळा आल्यावर अवधूत या फार्म हाऊसवर जातो.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या जयतपाड या गावात त्याचा प्रशस्त फार्म हाऊस आहे.

गुप्ते फार्महाऊस असं त्याच्या हा फार्महाऊसचं नाव आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी मोठी हिरवळ असल्याचं पाहायला मिळते.

अवधूतने प्रचंड मोठं, प्रशस्त असं फार्महाऊस बांधलं असून यात स्विमिंग पूल वगैरेदेखील आहे.

बऱ्याचदा अवधूतचे मित्रमंडळीदेखील या फार्म हाऊसला भेट देत असतात.