परी म्हणू की सुंदरा…!! पांढऱ्या ड्रेसमध्ये अवनित कौर दिसतेय भलतीच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 05:02 PM2024-06-02T17:02:12+5:302024-06-02T17:13:46+5:30

अवनित कौरने शेअर केले खास फोटो, पांढऱ्या ड्रेसमध्ये कहर दिसतेय

टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत आपली दमदार छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे अवनित कौर.

अवनित सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.

नुकतेच तिनं 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये धमाकेदार पदार्पण केलं. यावेळी तिच्या लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

कान्समधील काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

यावेळी तिने परिधान केलेल्या आउटफिटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्रीनं व्हाईट बॉडीकॉन ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.

बोल्ड मेकअप आणि त्याला साजेशी हेअरस्टाईलही तिने केली आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

अवनीत कौरने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. डान्स इंडिया डान्स लिल मास्टर्स, झलक दिखला जा 5, मर्दानी, चंद्र नंदिनी, अलादीन-नाम तो सुना होगा आणि टिकू वेड्स शेरू या कलाकृतींमध्ये अवनीत कौर महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आली आहे.

कंगना रणौतच्या 'टिकू वेड्स शेरू' या सिनेमातही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय 'मर्दानी', दोस्त', 'मर्दानी २' या सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.

लवकरच ती 'लव्ह इन व्हिएतनाम'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.