निसर्गाच्या सानिध्यात हरवली कावेरी; मनालीमध्ये निवांत क्षण घालवतीये तन्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 12:04 PM2024-06-05T12:04:39+5:302024-06-05T12:16:48+5:30

Tanvi mundale: तन्वी निसर्गाच्या सानिध्यात तिचा क्वालिटी टाइम घालवत आहे. त्यामुळे येथील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तन्वी मुंडले. 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतून तन्वी अल्पावधीत लोकप्रिय झाली.

सोशल मीडियावर तन्वी चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्याविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सध्या तन्वी तिच्या गर्ल गँगसोबत मनाली, अमृतसर दौऱ्यावर आहे. यावेळी तिच्यासोबत अभिनेत्री अनुष्का सरकातेदेखील असल्याचं दिसून येत आहे.

सध्या तन्वी निसर्गाच्या सानिध्यात छान वेळ घालवत आहे.

तन्वी मनालीमध्ये तिची सुट्टी एन्जॉय करत आहे.

तन्वीने गोल्डन टेम्पललादेखील भेट दिली. येथील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

तन्वीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते.