IN PICS : साईड बिझनेसमधून खोऱ्यानं पैसा कमावतात हे टीव्ही स्टार्स, पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 04:42 PM2021-11-08T16:42:37+5:302021-11-08T16:54:40+5:30

टीव्हीच्या एका शोमध्ये काम करून कलाकार बक्कळ कमाई करतात. पण याशिवायही अनेक मोठ्या टीव्ही स्टार्सचे अनेक साईड बिझनेस आहेत.

बिग बॉस 15 मध्ये धमाका करणारा करण कुंद्राचं जालंधरमध्ये स्वत:चं एक कॉल सेंटर आहे. याशिवाय त्याच्या वडिलांचाही स्वत:चा बिझनेस आहे. तो आपल्या वडिलांचा बिझनेसही सांभाळतो.

अर्जुन बिजलानीने मुंबई टायगर टीम खरेदी केली आहे. त्याची ही टीम बॉक्स क्रिकेट लीग खेळते. रिपोर्टनुसार, मुंबईत त्याचा एक बार असल्याचे समजते.

गौतम गुलाटी हा सुद्धा बिझनेसच्या बाबतीत मागे नाही. त्याचा दिल्लीत एक नाइट क्लब आहे.

टीव्ही अभिनेता आमिर अलीचं मुंबईत बसंती नावाचं हॉटेल आहे. आमिर अलीच्या या हॉटेलमध्ये अनेकदा बॉलिवूड व टीव्ही स्टार्स डिनरसाठी येतात.

अनुषा दांडेकर मॉडेल आहे. पण तिचा स्वत:चा बिझनेसही आहे. काही वर्षांपूर्वी तिने स्वत:चा ब्युटीकेअर व स्किनकेअर ब्रँड लॉन्च केला होता.

रवी दुबे व सरगुन मेहता या टीव्हीवरच्या लोकप्रिय कपलचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस आहे. उडारिया हा शो याच बॅनरची निर्मिती आहे.

कुशाल टंडनचे मुंबईत एक शानदार रेस्टॉरंट आहे. फावल्या वेळात तो आपल्या या बिझनेसकडे लक्ष देतो.

संजीदा शेखचं मुंबईत एक सलून आहे. संजीदाने या सलूनला स्वत:चं नाव दिलं आहे.

रक्षंदा खानची स्वत:ची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. सेलिब्रिटी लॉकर असं तिच्या या कंपनीचं नाव आहे.

कुमकुम भाग्य फेम शब्बीर अहलुवालिया याचं स्वत:चं फ्लाइंग टर्टल नावाचं प्रॉडक्शन हाऊस आहे.

Read in English