६ वर्षांतच मोडला पहिला संसार, आता 'बिग बॉस' फेम प्रियांका देशपांडेने पुन्हा बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:58 IST2025-04-17T16:55:32+5:302025-04-17T16:58:41+5:30

बिग बॉस फेम प्रियांका देशपांडे लग्नाच्या बेडीत अडकली आहे. प्रियांकाने बुधवारी(१६ एप्रिल) बॉयफ्रेंड वासीसोबत सात फेरे घेत पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात केली आहे.

बिग बॉस फेम प्रियांका देशपांडे लग्नाच्या बेडीत अडकली आहे. प्रियांकाने बुधवारी(१६ एप्रिल) बॉयफ्रेंड वासीसोबत सात फेरे घेत पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात केली आहे.

लग्नाचे फोटो प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. तर तिने गुपचूप लग्न केल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

प्रियांकाने कुटुंबीय आणि अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत वासीसोबत लग्नगाठ बांधली.

पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला. प्रियांकाने लग्नासाठी ट्रेडिशनल दाक्षिणात्य लूक केला होता.

प्रियांका देशपांडेचं हे दुसरं लग्न आहे. प्रियांकाने २०१६ मध्ये प्रवीण कुमारशी लग्न केलं होतं. मात्र त्यांचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. ६ वर्षांनी २०२२ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले.

प्रियांका बिग बॉस तमिळमध्ये सहभागी झाली होती. तिने अनेक टीव्ही शोदेखील होस्ट केले आहेत.

प्रियांकाच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत तिला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.