Photos : बोल्ड आणि ब्युटीफुल जान्हवी किल्लेकर, किलर अदा पाहून चाहते घायाळ By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 04:31 PM 2024-09-24T16:31:14+5:30 2024-09-24T16:42:39+5:30
'बिग बॉस'च्या घरात कल्ला करणाऱ्या जान्हवी किल्लेकरच्या 'किलर' अदा! अभिनेत्री जान्हवी किल्लेकर एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनयाबरोबरच जान्हवी तिच्या सौंदर्याने आणि हॉटनेसने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात जान्हवी सहभागी झालेली असून पहिल्या दिवसापासूनच ती घरातील चर्चेतील चेहरा आहे.
खेळाबरोबरच जान्हवी तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते.
नुकतेच 'बिग बॉस'च्या घरात पत्रकार परिषद झाली. यावेळी जान्हवीने खास वेस्टर्न लूक केला होता.
जान्हवीच्या या बोल्ड आणि ब्युटीफुल लूकचे फोटो तिच्या इन्स्टावर शेअर केले आहेत.
यामध्ये जान्हवी ही काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अगदी हॉट दिसतेय.
जान्हवीच्या या हॉट फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
'बिग बॉस'च्या घरात कल्ला करणाऱ्या जान्हवी किल्लेकरच्या फॅशनचीही बरीच चर्चा रंगली आहे.
जान्हवीचा गेम जबरदस्त असला तरी ती 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी उचलते की नाही, हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.