'बिग बॉस मराठी ५'मधील गायक अभिजीत सावंतची पत्नी काय करते? पाहा फॅमिली फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 05:44 PM2024-07-29T17:44:40+5:302024-07-29T18:06:20+5:30

अभिजीत सावंत 'बिग बॉस मराठी ५'मध्ये सहभागी झालीय. त्याच्या कुटुंबाचे हटके फोटोज पाहा (abhijeet sawant, bigg boss marathi 5)

मराठमोळा गायक अभिजीत सावंत हा इंडियन आयडॉल सीझन १ चा विजेता आहे. अभिजीत बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सहभागी झालाय.

अभिजीत सावंतने 'मोहब्बते लुटाऊंगा' या गाण्यावर 'बिग बॉस मराठी ५'मध्ये एन्ट्री घेतली.

अभिजीत सावंतचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून त्याला दोन मुली आहेत. अभिजीतच्या सोशल मीडियावर त्याचे कुटुंबासोबतचे फोटो दिसून येतात.

अभिजीतच्या पत्नीचं नाव आहे शिल्पा एडवणकर-सावंत. शिल्पाचा स्वतःचा केकचा व्यवसाय असून अस्मी नावाने हा बिझनेस करते.

अभिजीतच्या दोन मुलींचं नाव आहे समीरा आणि आहाना. अभिजीत काही महिन्यांपूर्वी पत्नी अन् मुलींना घेऊन परदेश सफरीवर गेलेला

अभिजीत सावंत हा ४२ वर्षांचा असून त्याने दादरच्या राजा शिवाजी विद्यालयातून शिक्षण घेतलंय

सूरांची जादू करणारा अभिजीत सावंत 'बिग बॉस मराठी ५'मध्ये काय कल्ला करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.