सुटला माझा पदर बाई...; 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट, साडीत दाखवल्या हॉट अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 12:33 PM2024-08-06T12:33:00+5:302024-08-06T12:37:02+5:30

रुचिराने साडीमध्ये हॉट फोटोशूट केलं आहे. लाल रंगाची साडी आणि पिवळ्या रंगाच्या ब्लाऊजमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे.

अभिनेत्री रचिरा जाधव माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी होऊन ती प्रसिद्धीझोतात आली होती.

रुचिराचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.

नुकतंच रुचिराने साडीमध्ये हॉट फोटोशूट केलं आहे. लाल रंगाची साडी आणि पिवळ्या रंगाच्या ब्लाऊजमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे.

फोटोसाठी रुचिराने खास बोल्ड पोझही दिल्या आहेत. तिच्या हॉटनेसने चाहते घायाळ झाले असून रुचिराच्या या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे.

रुचिराचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

सध्या रुचिरा तिच्या बाबू या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

या सिनेमात रुचिराबरोबर अभिनेता अंकित मोहन मुख्य भूमिकेत आहे. २ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.