शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिची महिन्याची सॅलरी किती माहितीये? त्या रकमेत मुंबईत येईल आलिशान घर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 05:58 PM2023-09-06T17:58:36+5:302023-09-06T18:02:57+5:30

Pooja dadlani: शाहरुख त्याच्या सिनेमांसाठी कोट्यवधी रुपयांची फी आकारतो त्याचप्रमाणे तो त्याच्या मॅनेजरलाही तसाच पगार देतो.

बॉलिवूड अभिनेता किंग खान अर्थात शाहरुख खान याच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर चर्चेत येते.

सध्या सोशल मीडियावर शाहरुखच्या मॅनेजरची चर्चा रंगली आहे. शाहरुखच्या मॅनेजरचं नाव पूजा ददलानी आहे.

पूजा २०१२ पासून शाहरुखची मॅनेजर म्हणून काम करत आहे.

पूजा शाहरुखच्या प्रोफेशनल लाइफसह त्याच्या पर्सनल आयुष्यातीलही अनेक गोष्टीकडे जातीपूर्वक लक्ष ठेवते. यात शाहरुखच्या व्यस्त वेळापत्रकाचं नियोजनही तीच करते.

शाहरुख केवळ अभिनेता नसून एक उद्योजकही आहे. त्यामुळे त्याच्या व्यावसायिक गोष्टींकडेही ती लक्ष देते.

पूजा शाहरुखच्या कुटुंबाचाच एक भाग आहे. त्यामुळे गौरी, सुहाना आणि इब्राहिम यांच्यासोबतही तिचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

शाहरुख त्याच्या सिनेमांसाठी कोट्यवधी रुपयांची फी आकारतो त्याचप्रमाणे तो त्याच्या मॅनेजरलाही तसाच पगार देतो.

पूजा तिच्या कामासोबतच तिच्या हटके लाइफमुळेही चर्चेत येते.

पूजा सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या मुलीसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

पूजाचं वार्षिक उत्पन्न अंदाजे ८ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. त्यानुसार, तिची महिन्याची सॅलरी ६६ लाख रुपये आहे.