चॅलेंज! अभ्यास करताना रडणारी ‘ही’ मुलगी आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री, ओळखून दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 11:12 AM2021-12-20T11:12:10+5:302021-12-20T11:23:33+5:30

बॉलीवूड कलाकारांच्या फॅन्सना त्यांची एक झलक पाहायला मिळाली तरी आनंद होतो. आपल्या आवडत्या कलाकाराचा फोटो आणि व्हिडीओ पाहण्यासाठी फॅन्स सोशल मीडियावर अनेकदा प्रतिक्षा करत असतात. सध्या एक फोटो असाच व्हायरल होत आहे.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो समोर आला आहे. ज्यात ही अभिनेत्री तिच्या आईसोबत दिसून येत आहे. ही अभिनेत्री सध्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय आहे. कारण एका परफेनिस्ट अभिनेत्यासोबत तिचं नाव जोडलं जात आहे.

फोटो समोर आला परंतु हा फोटो कोणत्या अभिनेत्रीचा आहे हे सांगणं चाहत्यांसाठी अवघड बनलं आहे. सोशल मीडियावर या अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो व्हायरल होत आहे. मात्र तिची ओळख सांगणं कठीण आहे. हा फोटो कोणाचा असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

हा फोटो अन्य कोणाचा नसून अभिनेत्री फातिमा सना शेखचा आहे. फोटोत ती अभ्यास करताना दिसत असून तिच्यासोबत आई बसल्याचं दिसून येते. फातिमा सना शेख सध्या बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत जवळीक असल्यानं चर्चेत आहे.

फातिमानं तिच्या करिअरची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. चाची ४२० या सिनेमात अभिनेता कमल हसन आणि अभिनेत्री तब्बू यांच्या मुलीची भूमिका फातिमानं केली होती. त्याशिवाय बडे दिलवाला, वन टू का फोर, सिनेमातही ती नजरेस आली होती.

आमिर खानचा सिनेमा दंगलमध्ये तिने काम केले आहे. ज्यात फातिमानं आमिर खानच्या मुलीची भूमिका निभावली आहे. इतकचं नाही तर ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्येही आमिर खानसोबत रोमॅन्टिक केमिस्ट्री दिसून आली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

आगामी काळात फातिमा फिल्ड मार्शल सैम मानकशॉ यांच्या बायोपिक सैम बहादुरमध्ये भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका निभावणार आहे. आमिर खानने लग्नानंतर जवळपास १५ वर्षांनी पत्नी किरण रावसोबत घटस्फोट घेतला.

त्यानंतर आमिर खान, किरण राव यांचं नाव सोशल मीडियात चर्चेत होतं पण त्याचसोबत तिसरं नाव होतं ते म्हणजे फातिमा शेख. आमिर खानसोबत फातिमाचं अफेअर सुरु असल्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या होत्या. दोघांचे फोटोही व्हायरल झाल्याचं दिसून आले होते.

अभिनेत्री फातिमा शेखमुळे आमिर खाननं किरण रावला घटस्फोट दिल्याचं बोललं जातं. आमिर खानने त्याच्या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिला त्यानंतर तो फातिमासोबत तिसरं लग्न करणार असल्याची चर्चा वेगाने वाढली. परंतु एका मुलाखतीत फातिमानं त्यावर स्पष्टीकरण दिले होते.

फातिमानं एका मुलाखतीत म्हटलं होतं की, सुरुवातीला मला या चर्चांमुळे काही फरक पडत नव्हता. मात्र आता दु:ख होतं. असे अनोळखी लोकं ज्यांना मी कधीही भेटले नाही ते माझ्याबद्दल काहीही लिहितात. जे लोकं या बातम्या पसरवतात असं तिने म्हटलं होतं.