बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघच्या फोटोंनी वेधलं लक्ष, हॉट लूक पाहून चाहते घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 03:58 PM2024-06-06T15:58:28+5:302024-06-06T16:18:24+5:30

अभिनेत्री शर्वरी वाघ ही मुंज्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे.

यातच शर्वरीनं सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

या फोटोंमधील तिच्या घायाळ करणाऱ्या अदांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय.

पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये शर्वरी कहर दिसत आहे. बोल्ड पोझ देत तिनं चाहत्यांना घायाळ केलंय.

शर्वरी वाघच्या या फोटोंमध्ये तिचा लूक खूपच हॉट आणि गॉर्जियस दिसत आहे.

शर्वरीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला असून, या फोटोंवर ते खूप लाईक आणि कमेंट करत आहेत.

शर्वरी वाघ ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांची नात आहे.

तिने 'द फरगॉटन आर्मी- आझादी के लिये' या वेबसिरिजमधून तिच्या अभियनच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

या सिरिजच्या आधी लव्ह रंजन आणि संजय लीला भन्साळी यांच्यासह सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं होतं.

आता तिचा मुंज्या हा सिनेमा 7 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.