सलमान खानचा मोठा निर्णय; मृत्यूनंतर संपत्ती करणार 'यांच्या' नावे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 10:48 AM2021-11-02T10:48:18+5:302021-11-02T11:01:40+5:30

Salman khan: सध्या सोशल मीडियावर सलमानची एक जुनी मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीत सलमानने त्याच्या पश्चात त्याच्या संपत्तीचं काय करणार हे सांगितलं आहे.

बॉलिवूडचा भाईजान, दबंग खान अशा एक ना अनेक नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सलमान खान. चित्रपट असो वा वैयक्तिक आयुष्य सलमान सातत्याने चर्चेत असतो.

सलमानविषयी रंगणाऱ्या अनेक चर्चांमध्ये कायम एक चर्चा रंगते ती म्हणजे त्याच्या लग्नाची. सलमान लग्न कधी करणार असा प्रश्न कायमच चाहत्यांसोबत सेलिब्रिटींना पडतो. त्यामुळे अनेकदा मुलाखतींमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमात भाईजानला हा प्रश्न हमखास विचारला जातो.

सलमानने आज वयाची ५० पार केली आहे. या ५० वर्षांच्या काळात त्याने कलाविश्वात मोठं नाव कमावलं. केवळ नावच नाही तर अमाप संपत्ती कमावली आहे. परंतु, अजूनही अविवाहित असलेल्या सलमानचा पुढे कोणीही वारसदार नसल्यामुळे त्याच्या पश्चात या संपत्तीचं काय होणार असा प्रश्नही अनेकांना पडतो.

सध्या सोशल मीडियावर सलमानची एक जुनी मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीत सलमानने त्याच्या पश्चात त्याच्या संपत्तीचं काय करणार हे सांगितलं आहे.

तुझ्या पश्चात म्हणजेच मृत्यूनंतर तू तुझ्या संपत्तीचं काय करणार? असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला होता. त्यावर सलमानचं उत्तर ऐकून अनेक जण खूश झाले.

"मी लग्न केलं काय आणि नाही केलं काय.. माझ्या मृत्यूनंतर माझ्या संपत्तीमधील अर्धा वाटा मी एका ट्रस्टला दान करणार आहे. तसंच जर मी लग्न केलंच नाही तर माझी संपूर्ण संपत्ती त्या ट्रस्टच्या नावाने केली जाईल", असं सलमान म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "काही वर्षांपूर्वी मी Being Human foundation या नावाने एका ट्रस्टची स्थापना केली आहे. याच ट्रस्टला माझ्या संपत्तीमधील अर्धा वाटा देण्यात येईल."

दरम्यान, सलमान हा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. त्यामुळे त्याची लाईफस्टाइलदेखील तितकीच लक्झरी आहे.

सलमान बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता असून आजवरच्या कारकिर्दीत त्याने असंख्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

फावल्या वेळात सलमान अनेकदा त्याच्या फार्म हाऊसवर वेळ घालवत असतो. मध्यंतरी लॉकडाउनच्या काळात तो येथे शेती करताना दिसला होतो.

Read in English