श्रेया बुगडेच्या ड्रीम हाऊसची खास झलक,पहिल्यांदाच बघा या आलिशान घराचे Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 11:27 AM2021-05-22T11:27:27+5:302021-05-22T11:37:48+5:30

विनोदवीर पुरुषांमध्ये श्रेया बुगडे हिने आपल्या कॉमेडीच्या भन्नाट टायमिंगने रसिकांच्या काळजात वेगळं स्थान मिळवलं आहे. महिला कॉमेडीयन म्हणून श्रेयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच श्रेया बुगडेबद्दल जाणून घेण्यासाठी रसिक कायमच उत्सुक असतात. सोशल मीडियावरही श्रेयाची बरीच चर्चा असते. तिचे विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळत असतात.

श्रेया बुगडेचे आलिशान आणि शानदार घर आहे.

श्रेयाने तिच्या घराचेही फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत.

घराचे फोटो पाहून चाहते तिच्या घराचीही वाह वा करताना दिसतात.

घराचे इंटेरियर कुणाच्याही नजरेत भरणारे आहे.

घरातील बेडरुम, किचन, , डायनिंग रुम आणि हॉलची फोटो बघून त्याच्या सुंदर इंटेरियरचा अंदाज लावला जाऊ शकतो.

निसर्गाशी जवळीक साधणारे श्रेयाचे घर आहे.

घरात भली मोठी बाल्कनी असून त्यात फुल आणि विविध झाडांची रोपं लावल्याची पाहायला मिळेल.

श्रेयाने तिच्या घराचे अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी श्नेयाने बरीच मेहनत घेतली आहे.

घरातल्या वस्तूदेखील निटनिटक्या पद्धतीने ठेवल्याचे पाहायला मिळतंय.

श्रेयाला वाचनाची आवड आहे, त्यामुळे अनेकदा निवांत पुस्तक वाचताना दिसते.

या फोटोजमध्ये ती घरात निवांत क्षण घालवताना पाहायला मिळत आहे.