श्रेया बुगडेच्या आईवडिलांना पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 12:53 PM2024-10-30T12:53:15+5:302024-10-30T13:00:37+5:30

श्रेयाच्या आईवडिलांच्या लग्नाचा आज ४३वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने श्रेयाने तिच्या आईवडिलांचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या श्रेयाला 'चला हवा येऊ द्या'मुळे प्रसिद्धी मिळाली.

श्रेयाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच श्रेयाने तिच्याआईवडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

श्रेयाच्या आईवडिलांच्या लग्नाचा आज ४३वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने श्रेयाने तिच्या आईवडिलांचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

श्रेया हुबेहुब तिच्या आईसारखी दिसते, हे फोटो पाहून लक्षात येईल. तिला एक मोठी बहिणही आहे.

हे फोटो शेअर करत श्रेयाने तिच्या आईवडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

"तुमच्या प्रेमाने मला निस्वार्थ आणि कमिटमेंटचं सौंदर्य पाहायला शिकवलं. तुमचं प्रेम नेहमीच प्रेरणा देत राहील", असं श्रेयाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

श्रेयाने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.