PHOTO: दूर्गा पूजेसाठी श्रेया बुगडेचा साजशृंगार; पारंपरिक वेशभूषा ठरतेय लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 06:05 PM2024-10-11T18:05:36+5:302024-10-11T18:15:21+5:30

दुर्गा पूजा फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे.

अशातच सोशल मीडियावर श्रेया बुगडेने दुर्गा पूजा निमित्ताने काही खास फोटो शेअर केले आहेत.

नवरात्रीच्या सातव्या दिवसापासून ते विजयादशमीपर्यंत दुर्गादेवीची आराधना केली जाते.

दरम्यान, 'चला हवा द्या' फेम श्रेया बुगडे दुर्गा मातेच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय.

सोशल मीडियावर दुर्गा पूजेच्या निमित्ताने अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये श्रेयाची आई आणि बहीणही दिसतेय.

दुर्गा पूजेसाठी तिने पांढरी साडी त्यावर डायमंड सेट घातलाय.

दुर्गा पूजेच्या वेगवेगळ्या विधीचं दर्शन तिने या फोटोंच्या माध्यमातून नेटकऱ्यांना घडवलंय.

श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसते.