Charu Asopa : "संशय घेतला, ड्रायव्हरसोबत लफडं सुरू असल्याचं म्हणाला"; अभिनेत्रीचे पतीवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 18:37 IST2025-02-25T18:32:17+5:302025-02-25T18:37:08+5:30
Charu Asopa And Rajeev Sen : चारू आणि राजीव यांच्यातील वाद टोकाला गेले आहेत.

अभिनेत्री चारू असोपा तिचा पती राजीव सेनपासून वेगळी राहत आहे. चारू आणि राजीव यांच्यातील वाद टोकाला गेले आहेत. दोघांना एक गोड मुलगी आहे.
अभिनेत्रीने पतीवर खूप गंभीर आरोप केले आहेत. तिचा नवरा तिच्यावर संशय घेतो तसेच तिला खूप वाईट बोलतो असं याआधी सांगितलं आहे.
चारूने एका मुलाखतीत म्हटलं की, "काहीच कारण नसताना पती संशय घेतो. घरात कोणी आलं आणि मी त्यांच्याशी बोलली तरी संशय घेतो."
"ड्रायव्हरसोबत तुझं लफडं सुरू आहे असं देखील तो मला म्हणाला. मी मॅरिज काऊंसलरकडे जाण्यासाठी तयार होते पण तो कधी आलाच नाही."
"मला वाटतं की तो मला धोका देत आहे. त्याचं कोणासोबत तरी अफेअर सुरू आहे. तो नेहमीच दिल्लीला जात असतो."
"राजीवने माझं जगणं अवघड केलं होतं. तो सेटवर सर्वांना फोन आणि मेसेज करायचा की, चारूपासून लांब राहा" असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
चारू आणि राजीवने अद्याप घटस्फोट घेतलेला नाही. तो त्याच्या मुलीला भेटायला नेहमीच येत असतो.
अभिनेत्री सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती तिच्या मुलीसोबतचे सुंदर फोटो शेअर करत असते.