De Dhakka2 - शहाजीबापूंनीच आमचा डायलॉग घेतलाय, महेश मांजरेकर असं का म्हणाले By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 12:17 PM 2022-08-05T12:17:48+5:30 2022-08-05T12:29:09+5:30
महेश गलांडे - २००८ साली 'दे धक्का' चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे घेऊन आला. चित्रपटातील कुटुंब आणि प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलसं वाटलं. कथा भावली आणि प्रेक्षकांनी सिनेमाला डोक्यावर घेतलं. आता १३ वर्षांनंतर या सिनेमाचा सिक्वल भेटीला येतोय. या निमित्तानं 'दे धक्का-२' च्या टीमसोबत 'लोकमत'सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि सिनेमाशी निगडीत आठवणी, गमतीजमती आणि अनुभव कथन केला. २००८ साली 'दे धक्का' चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे घेऊन आला. चित्रपटातील कुटुंब आणि प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलसं वाटलं. कथा भावली आणि प्रेक्षकांनी सिनेमाला डोक्यावर घेतलं.
२००८ साली 'दे धक्का' चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे घेऊन आला. चित्रपटातील कुटुंब आणि प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलसं वाटलं. कथा भावली आणि प्रेक्षकांनी सिनेमाला डोक्यावर घेतलं.
दे धक्का 2 चित्रपट आज प्रदर्शित आहे, तत्पूर्वी त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटात गुवाहाटीची झलक पाहायला मिळाली होती. बंडखोर आमदारांपैकी एक असलेल्या शहाजी बापूंचा डायलॉग चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसून आला.
काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील... ओक्केमधीय असा आमदार शहाजी बापू पाटील यांचा डायलॉग चांगलाच व्हायरल झाला. या डायलॉगवर मिम्सचा पाऊस पडला. तर, गाणीही धुमधडाक्यात वाजली.
काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील... ओक्केमधीय असा आमदार शहाजी बापू पाटील यांचा डायलॉग चांगलाच व्हायरल झाला. या डायलॉगवर मिम्सचा पाऊस पडला. तर, गाणीही धुमधडाक्यात वाजली.
काही दिवसांपूर्वी शहाजीबापू पाटील हे पत्नीसह चला हवा येऊ द्याच्या कार्यक्रमात दिसून आले. त्यावेळीही, त्यांनी तो डायलॉग म्हटला होता. आता, दे धक्का 2 चित्रपटातही शिवाजी साटम यांनी ग्रामीण भागातील आजोबाची भूमिका निभावलीय.
या चित्रपटात साटम यांनी काय झाडी.. काय हाटील... असा डायलॉग म्हटला आहे. लंडनमध्ये गेल्यानंतर तेथील झाडी आणि हाटील पाहून त्यांनी हा डायलॉग उच्चारला. त्यामुळे, या चत्रपटात हा डायलॉग कसाकाय घेतला, यासंदर्भात शिवाजी साटम यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी उत्तर दिलं.
चित्रपटात हा डायलॉग अचानक अॅड झालेला नाही. आम्ही शूट करत असलेलं लंडनमधील लोकेशनच तसं होतं. त्यामुळे स्क्रीप्टच्या गरजेनुसार तो अगोदरच घेतलेला डायलॉग आहे. महेश मांजरेकर गंमतीने म्हणतात शहाजाबापूंनीच आमचं पाहून तो डायलॉग घेतलाय, असं उत्तर शिवाजी साटम आणि मकरंद अनासपुरे यांनी दिलं.
तसेच, तुम्ही नीट बघा चित्रपटात माझं कॅरेक्टरही तसंच ग्रामीण भागातलं आहे. त्यामुळे आपसूकच तो संवाद तोंडातून आणि मनातून बाहेर येतो. बाब्बो... वैगेरे आपण म्हणतो. तसाच तो काय झाडी... आलेला डायलॉग आहे.