दीपिका कक्कडने मुस्लीम धर्म स्विकारुन केलं होतं लग्न, नावही बदललं By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 01:17 PM 2022-02-22T13:17:08+5:30 2022-02-22T13:24:11+5:30
'ससुराल सिमर का' मालिकेतील अभिनेत्री दीपिका कक्कड आणि अभिनेता शोएब इब्राहिम यांच्या लग्नाचा आज वाढदिवस साजरा होत आहे. सन 2018 साली आजच्यादिवशीच दोघांनी लग्नगाठ बांधली होती. 'ससुराल सिमर का' मालिकेतील अभिनेत्री दीपिका कक्कड आणि अभिनेता शोएब इब्राहिम यांच्या लग्नाचा आज वाढदिवस साजरा होत आहे. सन 2018 साली आजच्यादिवशीच दोघांनी लग्नगाठ बांधली होती.
दीपिका आणि शोएबच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. कारण, लग्नापूर्वी दिपिकाने शोएबासाठी इस्लाम धर्म स्विकारला होता. त्यामुळे, लग्नानतंर दिपिकाचे नाव फैजा ठेवण्यात आले होते.
दिपिका हे नाव केवळ घरातच वापरते, मात्र, लग्नानंतर अनेक बाबींचा या जोडप्याला सामना करावा लागलाा होता. दिपिकाने केवळ धर्मच बदलला नव्हता, तर यापूर्वी घटस्फोट घेतल्यानंतर हे तिचं दुसरं लग्न होतं.
दिपिकाचं लग्न शोएबच्या मूळगावी म्हणजे युपीतील मौदाहा या गावात झालं होतं. या लग्नासाठी गावातील सर्वच लोकं आले होते. लग्नावेळी तिच्या धर्म परिवर्तनाची बाब लपविण्यात आली होती.
दिपिकाला माध्यमांसमोर या प्रश्नाला सामोरे जावे लागले, त्यानंतर दिपिकाने स्वत:हून होय मी धर्मपरिवर्तन केल्याचं सांगितलं. जे सत्य आहे ते सत्य आहे. मी धर्मपरिवर्तनाच्या बाबतीत जास्त चर्चा करू इच्छित नाही, असेही तिने म्हटले.
दिपिका आणि शोएब सध्या आनंदी जीवन जगत आहेत, दोघांचे रोमँटीक फोटो सध्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय असतात. दिपिका आणि शोएब यांची भेट ससुराल सिमर का या मालिकेच्या सेटवर झाली होती.