Deepika Padukone Pregnancy Photoshoot दीपिकाचं हटके प्रेग्नेंसी फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बंप, रणवीरही दिसला रोमँटिक अंदाजात By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 06:46 PM 2024-09-02T18:46:21+5:30 2024-09-02T18:53:02+5:30
Deepika Padukone And Ranveer Singh Maternity Photoshoot : पठाण, जवान आणि कल्की 2898 सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. पठाण, जवान आणि कल्की 2898 सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.
दरम्यान, नुकतेच दीपिका पादुकोणनं प्रेग्नेंसी फोटोशूट केले आहे. यात तिने अभिनेता रणवीर सिंगसोबतही पोझ दिले आहेत.
दीपिका पादुकोणने शेअर केलेल्या फोटोत तिने ट्रान्सपरेंट आउटफिटमधून बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे.
तर काही फोटोंमध्ये दीपिका आणि रणवीर रोमँटिक अंदाजात दिसत आहे.
बेबी बंपमध्ये सुद्धा दीपिका खूप बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.
दीपिकाच्या प्रेग्नेंसी फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
दीपिकाला २८ सप्टेंबर डिलिव्हरी डेट दिल्याचे समजते आहे.
सध्या ती प्रेग्नेंसी एन्जॉय करत असून तिने कामातून ब्रेक घेतला आहे.
दीपिका मार्च २०२५ पर्यंत कोणतेही काम घेणार नसल्याचे समजते आहे. ती कल्कीच्या सीक्वल शूटिंगला सुरूवात करणार आहे.
दीपिका आणि रणवीर बाळाच्या जन्मानंतर वांद्रे येथील नवीन आलिशान अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहेत. जे शाहरूख खानचा बंगला मन्नतच्या जवळ आहे.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लव्हस्टोरीची सुरुवात २०१३ मध्ये आलेल्या राम लीला चित्रपटातून झाली होती.
त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी लग्न केले.
या वर्षाच्या सुरुवातीला या जोडप्याने पालक होणार असल्याचे जाहीर केले आणि सप्टेंबरमध्ये बाळाचा जन्म होणार असल्याचे सांगितले.
दीपिका-रणवीरसोबत त्यांचे चाहते बाळाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत.