तुम हुस्नपरी तुम जाने जहाँ! अमृता फडणवीसांचा ग्लॅमरस लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 04:59 PM2024-10-01T16:59:32+5:302024-10-01T17:08:38+5:30

अमृता यांनी खास फोटोशूट केलं आहे. काळ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात अमृता यांनी हे फोटोशूट केलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायमच चर्चेत असतात. अमृता या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

नुकतंच अमृता यांनी खास फोटोशूट केलं आहे. काळ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात अमृता यांनी हे फोटोशूट केलं आहे.

याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोशूटसाठी अमृता यांनी खास पोझही दिल्या आहेत.

या फोटोशूटसाठी अमृता यांनी खास ग्लॅमरस लूक केला आहे. अमृता यांचं हे सौंदर्य बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देणारं आहे.

अमृता यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अमृता या पेशाने बँकर असून त्यांना गायनाची आवड आहे. आजवर त्यांनी अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

सामाजिक कार्यातही अमृता यांचा सहभाग असतो. त्या अनेक कार्यक्रमांना हजेरीही लावताना दिसतात.

अमृता या त्यांच्या वक्तव्यांमुळेही अनेकदा चर्चेत असतात. समाजातील घडामोडींवर त्या परखडपणे आपलं मत मांडताना दिसतात.

अमृता या अनेकदा राजकीय विषयावर आणि राज्यातील राजकारणावरही अगदी बिनधास्तपणे बोलताना दिसतात.