Dia Mirza : "तो सीन करताना मी थरथरत होती, मला उलटी झाली"; दीया मिर्झाने सांगितला शुटिंगचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:53 IST2025-04-17T13:47:50+5:302025-04-17T13:53:21+5:30

Dia Mirza : दीया मिर्झाने सीरीज काफिरमध्ये एक सीन शूट करताना तिची नेमकी काय अवस्था झाली होती याबद्दल सांगितलं आहे.

अभिनेत्री दीया मिर्झाने सीरीज काफिरमध्ये एक सीन शूट करताना तिची नेमकी काय अवस्था झाली होती याबद्दल सांगितलं आहे. तिच्यासाठी तो सीन करणं खूप अवघड झालं होतं.

दीयाने न्यूज १८ ला दिलेल्या माहितीनुसार, "एक रेप सीन होता. तो केल्यानंतर मला उलटी झाली. मला आठवतंय जेव्हा आम्ही रेप सीन शूट केला तेव्हा ते करणं कठीण होतं."

"तो सीन शूट करताना मी थरथरत होती. पूर्ण सीक्वेन्सनंतर मला उलटी झाली. इमोशनली आणि फिजिकली परिस्थिती अत्यंत अवघड होती."

"जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला त्या सीनमध्ये घेऊन जाता. ते अनुभवण्याचा प्रयत्न करता तेव्हा खरंच भयंकर अनुभव होता" असं दीयाने म्हटलं आहे.

काफिरमध्ये अभिनेत्रीने पाकिस्तानी महिलेची भुमिका साकारली आहे. जी चुकून भारतीय सीमेजवळ पोहोचते आणि तिला नंतर दहशतवादी समजलं जातं.

दीयाच्या या सीरीजचं भरभरून कौतुक करण्यात आलं. सहा वर्षांनंतर काफिर री-एडीट करून चित्रपटाच्या रुपात रिलीज केला जाणार आहे.

खऱ्या आयुष्यात आई होण्याआधी तिने काफिरमध्ये आईची भूमिका साकारली होती. तेव्हा तिच्यात मातृत्वाची भावना जागी झाली असं दीयाने म्हटलं आहे.

दीयाला एक गोंडस मुलगा आहे. दीया सोशल मीडियावर एक्टिव्ह असून तिचे असंख्य चाहते आहेत.