दिव्यांका त्रिपाठी ते संजीदा शेख... अ‍ॅक्टिंगसोबतच या गोष्टींमधूनही हे 12 टीव्ही स्टार्स कमावतात पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 08:00 AM2020-08-26T08:00:00+5:302020-08-26T08:00:02+5:30

अभिनयाव्यतिरिक्त हे स्टार्स करतात अनेक साईड बिझनेस

दिव्यांका त्रिपाठी - अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने तिचे होमटाऊन भोपाळमध्ये एक डान्स अ‍ॅकेडमी सुरु केली आहे.

आशका गोरडिया - अभिनेत्री आशका गोरडिया एक आऊटलेट चालवते. काही वर्षांपूर्वी तिने एक ब्युटी रेंजही लॉन्च केली होती.

शाहिर शेख - टीव्हीचा हँडसम अभिनेता शाहिर शेखचे चाहते भारतासोबतच इंडोनेशियातही आहेत. इंडोनेशियात शाहिरने एक प्रॉडक्शन हाऊस उघडले आहे.

अर्जुन बिजलानी - मुंबई अर्जुनचे एक वाइन शॉप आहे. याशिवाय बॉक्स क्रिकेट लीगच्या एक टीमचा तो को-ओनर आहे.

करण कुंद्रा - वडिलांच्या बिझनेसमध्ये मदत करण्यासोबतच करण कुंद्रा एक कॉल सेंटरही चालवतो.

रक्षंदा खान - अभिनेत्री रक्षंदा खान एक इव्हेंट कंपनी चालवते.

वाहबिज दोराबजी - अभिनेत्री वाहबिजची पुण्यात एक बेकरी शॉप आहे. ही बेकरी शॉप चांगलीच फेमस आहे.

संजीदा शेख - अ‍ॅक्टिंगसोबतच पर्सनल लाईफमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री संजीदा शेखच्या नावावर एक ब्युटी पार्लर आहे.

रोनित रॉय - टीव्हीवरचा लोकप्रिय अभिनेता रोनित रॉयचे एक सिक्युरिटी फर्म आहे.

मोहित मलिक - अभिनेता मोहित मलिक पत्नी सिंपलच्या मदतीने दोन रेस्टॉरंट चालवतो.

गौतम गुलाटी -‘बिग बॉस 8’चा विजेता गौतम गुलाटी एक मोठा बिझनेसमॅन आहे. गौतम दिल्लीतील एका लोकप्रिय नाईट क्लबचा मालक आहे.

आमिर अली - आमिर अलीचे बॉलिवूड थीम असलेले एक रेस्टॉरंट आहे.