सुधा शिवपुरी : क्यों की सास भी कभी बहू थी या मालिकेतील बा च्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुधा शिवपुरी यांचे मे महिन्यात निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. त्यांनी रजनी रिश्ते बंधन आणि सरहदे अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्येही भूमिका केल्या होत्या. तसेच दि बर्निंग ट्रेन माया मेमसाब अशा अनेक चित्रपटांमध्येही काम केले होते.मोहन भंडारी : खानदान कर्ज पंरपरा जीवन-मृत्यू पतझड गुमराह अशा अनेक मालिकांमधील अभिनयासाठी नावजाले गेलेल ज्येष्ठ टीव्ही अभिनेते मोहन भंडारी यांचे सप्टेंबर महिन्यात निधन झाले. त्यांनी प्रसिद्ध अभिनेता आणिर खानच्या मंगल पांडे या चित्रपटातही काम केले.संजीत बेदी : संजीवनी या टीव्ही मालिकेमुळे घराघरांत पोचलेला लोकप्रिया कलाकार संजीत बेदी याचे २३ जून रोजी निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. गेल्या काही महिन्यापासून तो मेंदूच्या आजाराने त्रस्त होता व त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारांदरम्यानच त्याने अखेरचा श्वास घेतला संजीत याने संजीवनीशिवाय जाने क्या बात हुई थोडी सी जमीन थोडा सा आसमान क्या होगा निम्मो का आणि कसौटी जिंदगी या या लोकप्रिय मालिकांमध्येही काम केले होते.रविंद्र जैन: सुमधूर संगीताने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक रविंद्र जैन यांचे ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. जैन यांनी गीत गाता चल चोर मचाये शोर चितचोर रामतेरी गंगा मैली विवाह यांसह १५० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले तसेच रामायण जय श्रीकृष्ण हनुमान साई बाबा यासारख्या गाजलेल्या टीव्ही मालिकांनाही त्यांनी पार्श्वसंगीत दिले.सईद जाफरी : चष्मेबद्दूर शतरंज के खिलाडी मासूम किसी से ना कहना मंडी राम लखन मशाल अजूबा हीना या आणि अशा अनेक चित्रपटांतील कामामुले नावजलेले गेलेले चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे १५ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.लाभ जंजुआ : क्वीन चित्रपटातील लंडन ठुमकदा असो वा इतर उडत्या चालीची गाणी लाभ जंजुआ यांच्या आवाजामुळे ती लोकांना ठेका धरायला भाग पाडत. बॉलिवूडमधील या गुणी गायकाचा २३ ऑक्टोबर रोजी राहत्या घरात मृत्यू झाला. त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार जंजुआ हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते. जनुजा यांनी बूम सिंग इज किंग रब ने बना दी जोडी पार्टनर अशा अनेक हिट चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले होते.आदेश श्रीवास्तव : चलते चलते बाबुल कभी खुशी कभ गम यांसारख्या अनेक हिट चित्रपटांना मधुर संगीतचा साज चढवणारे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आदेश श्रीवास्तव यांचे ५ सप्टेंबर रोजी निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते कॅन्सरशी लढा देत होते. त्यांच्या निधनामुळे संगीत सृष्टीवर शोककळा पसरली.साधना: निरागस चेहरा आणि अवखळ हास्याची देणगी लाभलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांचे २५ डिसेंबर रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णलयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साधना यांचे वक्त मेरा साया हम दोनो आप आए बहार आयी वो कौन थी? अनेक चित्रपट गाजले.