बड्या अभिनेत्री माझ्यासोबत काम करत नव्हत्या, तारा सिंगने सांगितली होती बॉलिवूडची दुसरी बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 06:48 PM2023-08-22T18:48:07+5:302023-08-22T19:15:49+5:30

सनी देओल म्हणाला, माझ्यासोबत सिनेमात काम करण्यासाठी मी त्यांना संपर्क करायचो, पण त्या...

बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2'चा (Gadar 2) बॉक्स ऑफिसवरील धुमाकूळ अजूनही सुरुच आहे. 'गदर 2' चा धुमाकूळ बघता इतक्यात तरी बॉक्सऑफिसचे आकडे कमी होतील असं वाटत नाही. 'गदर 2' हिट होण्याचं कारण म्हणजे हा सिनेमा फक्त सिनेमा नाही तर लोकांसाठी ते एक इमोशन आहे.

सध्या सनी देओल गदर २ च्या यशाचा आनंद लुटतोय. त्यामुळे सध्या तो सर्वत्र चर्चेत आहे. तब्बल २२ वर्षांनी या सुपरहिट सिनेमाच्या सीक्वेलसाठी प्रेक्षकही आतुर होते.

पण एकवेळ अशी होती जेव्हा सनी देओलसोबत बॉलिवूड मधील मोठ्या अभिनेत्री काम करायला तयार नव्हत्या.

ली पाच दशकं देओल कुटुंब बॉलिवूडवर अधिराज्य गाजवतं आहे. अभिनेता धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओलने ८०च्या दशकात बॉलिवूडमध्ये एंट्री केली.

अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत हिंदी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. पण म्हणावा तसा सन्मान आणि मान सनी देओला इंडस्ट्री मिळालं नाही.

एका मीडिया शोमध्ये दरम्यान बोलताना सनीने सांगितले होते की, मला ब्रँडिंग कसे करावे हे माहित नाही. त्यामुळे इतर कलाकार त्याच्या पुढे जायचे.

पुढे सनी देओल म्हणाला, की इंडस्ट्रीत अनेक मोठ्या अभिनेत्री आहेत ज्या त्याच्यासोबत काम करण्यास टाळाटाळ करायच्या. श्रीदेवी आणि ऐश्वर्या राय यांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिल्याचे सनीने सांगितले होते.

अभिनेत्याने खुलासा केला की, "जेव्हा 'घायल' चित्रपट बनत होता, तेव्हा मी यासाठी श्रीदेवींशी संपर्क साधला होता, परंतु त्यांनी चित्रपट करण्यास नकार दिला होता. यानंतर मी दुसरा चित्रपट करत असताना मी ऐश्वर्या रायला त्यासाठी विचारले पण तिनेही माझ्या चित्रपटासाठी नकार दिला.

काही दिवसांपूर्वी झालेल्या 'गदर 2' च्या पत्रकार परिषदेत सनी देओलने इंडस्ट्रीतील अभिनेत्रींवर ताशेरे ओढले होते. अभिनेत्याने सांगितले होते की, इथे अशा अनेक नायिका आहेत, ज्यांना चित्रपटात आईची भूमिका करायची नव्हत्या, पण आता कदाचित त्या तयार होतील.

दरम्यान सकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार 'गदर 2' ने आतापर्यंत 389.10 कोटींचा गल्ला जमावला आहे. त्यामुळे आता लवकरच हा सिनेमा 400 कोटींचा आकडा सहजपणे पार करणार आहे.