Gautami Patil : गौतमी पाटील एका शोसाठी घेते इतके मानधन, महिन्याची कमाई वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 04:59 PM2023-09-25T16:59:05+5:302023-09-25T17:01:59+5:30

Gautami Patil : सोशल मीडिया सेन्सेशन गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात तुडूंब गर्दी असते. पण गौतमी एका कार्यक्रमासाठी किती पैसे घेते माहिती आहे का?

सबसे कातील, गौतमी पाटील असे अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या गौतमी पाटीलची सगळीकडे खूप क्रेझ आहे.

सोशल मीडिया सेन्सेशन गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात तुडूंब गर्दी असते. पण गौतमी एका कार्यक्रमासाठी किती पैसे घेते माहिती आहे का?

बाळाच्या बारश्यापासून ते बर्थडे पार्टीपर्यंत गौतमी पाटीलची हजेरी सर्वांच्या अंगात एक वेगळाच उत्साह निर्माण करुन जाते. एका कार्यक्रमाचे दीड ते दोन लाख रुपये मानधन घेते.

गौतमी पाटील आणि तिच्या टीममध्ये या मानधनाचं वाटप झालं तरी गौतमी महिन्याला जवळपास ३०-३५ लाख रूपये कमावते.

सुरुवातीला गौतमी लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य करत असल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र, गौतमीने या सगळ्या गोष्टी लक्षात घेता डान्समध्ये सुधारणा केल्या.

तरीही तिच्या कार्यक्रमांवर अनेकांनी बंदी घालण्याची मागणी केली. या सगळ्याचा तिच्या कार्यक्रमांवर काडीमात्र फरक पडला नाही. तिची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनंतर गौतमी पाटील हे नावं चर्चेत आलं.

सोशल मीडिया सेन्सेशन गौतमी पाटील लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. तिची मुख्य भूमिका असलेला घुंगरू हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.